महाड - सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जलोष सुरू असताना रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये स्त्री अत्याचाराची घटना घडली आहे.महाड तालुक्यातील ढालकाठी गावातील रहिवासी २८ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तीच्या पतीने तीला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात पती दिपक झांजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर जखमी अवस्थेतील सदर महिलेला उपचारासाठी कस्तुरबा हाँसपिटल मुंबई येथे हालविण्यात आले आहे.आरोपी पतीला महाड एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस साह्ययक निरीक्षक युवराज खाडे आधिक तपास करीत आहेत.
अंगावर पेट्रोल टाकून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न