बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,अनेक तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने आयोजन

नवी मुंबई :- कोरोना काळात रोजगाराची झालेली पडझड व अनेकांची तळमळ पाहता राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने १५ जानेवारी २०२२ रोजी सानपाडा या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बहुतांश कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी उपल्बध असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा मेळावा सानपाडा रेल्वे स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्स, D - १०४, सानपाडा,नवी मुंबई या ठिकाणी पार पाडण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

               राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात तरुण तरुणींना रोजगार असल्याचे आव्हान करण्यात आले असता शेकडो जणांनी कामासाठी संघटनेच्या सानपाडा कार्यालयात हजेरी लावली.त्याचवेळी अनेक जण मंडळाच्या नियमात बसत नसल्याचे दिसून आले तर काही जणांना मंडळाव्यतिरिक्त दुसरीकडे नोकरी हवी असल्याचे निदर्शनास आले.राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या बेरोजगारानां राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने रोजगार देता यावा यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात d mart, Icici bank ,Hdfc bank, Axis Bank ,HDB finance, Kissht financ ,L&t finance, Ebicash, Megus , Cash management services, Krystal security, Ola mart , Eureka Forbes , Assuredge, Athena bpo, RBL bank या कंपन्या सहभागी असून इतरही कंपन्या सहभागी होणार आहेत.या सर्व कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असल्याने तरुणांना नक्कीच काम मिळेल अशी अपेक्षा योगेश महाजन यांनी व्यक्त करत कामासाठी 8689861548 / 9321804481 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे. 


Popular posts
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एम आय डी सी कडून नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप - चौकशीची मागणी 
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य
Image