श्री सद्गुरु भावे महाराज समाज गुरूवर्य ह.भ.प. वै.नारायणदादा घाडगे महाराज यांच्या १३ व्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. श्री रामदादा घाडगे महाराज यांना स्कार्पिओ कार भेट

पोलादपूर (निळकंठ साने) - तालुक्यातील कंरजे येथील श्री सद्गुरू भावे महाराज समाज गुरुवर्य , ईश्वरी महान विभूती ह.भ.प.वै.-नारायण दादा घाडगे महाराज यांच्या १३ व्या पुण्यथितीचे औचित्य साधून श्री सदगुरु भावे महाराज वारकरी समाज ट्रस्टी व शिष्यगण मुंबई, बडोदा, ठाणे ,ग्रामीण यांच्या वतीने आदरणीय गुरुवर्य ह.भ.प.श्री- रामदादा घाडगे  महाराज यांना भावे महाराज वारकरी संप्रदाय ट्रस्टीचे अध्यक्ष उमेशदादा केसरकर यांच्या हस्ते स्कार्पिओ कार भेट देण्यात आली. 

 जो न मागता करी ।

 त्यांचा परमात्मा कैवारी ।।

या संतवचनाप्रमाणे सढळ हस्ते आर्थिक मदत उमेशदादा केसरकर (अध्यक्ष), केशव सखाराम उतेकर (सेक्रेटरी) के.पी.गोळे (खजिनदार), वामन विठोबा साने (उद्योजक),ज्ञानोबा पांडुरंग रेणोसे डी.पी. (उद्योजक), बाळकृष्ण विठोबा उतेकर (उद्योजक), सुभाष दगडु रेणोसे ( उद्योजक ), पंढरीनाथ केसरकर (गायनाचार्य), कैलास रामदादा घाडगे, विठोबा बाबुराव साने (उद्योजक), चंद्रकांत विठोबा केसरकर, भाऊ तुकाराम साने (उद्योजक), गणेश मारुती आहिरे,  सोपान विठोबा साने (उद्योजक ), संजय ज्ञानोबा साने (उद्योजक ), ज्ञानोबा हनवती केसरकर , तुकाराम बाळु केसरकर , विशाल केसरकर, महादेव गोविंद केसरकर, के.पी.गोळे शंकर घाडगे , काशिराम कळंबे , सिताराम कळंबे (गायनाचार्य), भिमराव उतेकर (किर्तनकार), तात्याबा राघू साने (किर्तनकार) यांनी सद्गुरु चरणी मनोभावे  स्कार्पिओ कारसाठी आर्थिक सहकार्य केले.यावेळी आदि मान्यवर,ग्रामस्थ ,सर्व शिष्यगण, आणि महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण भेटीबद्दल बहुजन समाजातून आदरणीय दानशूरांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

Popular posts
सिडकोच्या इमारत पुनर्बांधणी धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल, १०० % ऐवजी केवळ ५१% सभासदांच्या संमतीने करता येणार इमारतींचा पुनर्बांधणी
Image
पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
Image
८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक , महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
१६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ पार , तरुण यशवंतांचा सत्कार करण्यासाठी विस्तृत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित
Image