मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप

नवी मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा दिन महाराष्ट्रात भव्य स्वरूपात करण्याचा आदेश मनसे पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई मनसेने यापूर्वी एक लाख नवी मुंबईकरांना पोस्ट कार्डद्वारे मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई शहरातील एकूण अकरा पोलीस स्टेशनपैकी पहिल्या टप्प्यात बेलापूर, एन.आर.आय, सागरी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, वाशी व कोपरखैरणे पोलीस स्टेशनला 'पोलीस तिथे पुस्तक' या अभिनव उपक्रमाअंतर्गत मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तकांची लायब्ररी भेट देण्यात आली. सदर वेळी पोलीस अधिकारी यांचा सन्मान देखील करण्यात आला. तसेच पोलिसांना मराठी भाषा दिनाच्या पोस्टकार्ड व गुलाब देत शुभेच्छा देण्यात आल्या. पहिला टप्पा जरी आज पार पडला असला तरी लवकरच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पोलीस स्टेशनला लायब्ररी भेट देण्यात येणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.

                      "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" या उक्तीप्रमाणे नेहमीच पोलीस काम करत असतात. कोरोना काळात देखील पोलिसांनी दिवस-रात्र केलेले काम आपण सर्वांनी अनुभवले आहे. समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असताना कामांचा ताण, बंदोबस्त, वेळी-अवेळी जेवण व अनेकदा अपुरी झोप अशा सगळ्या गोष्टींचा सामना खाकी वर्दीतला हा माणूस करत असतो. त्यांनाही या सगळ्यातून थोडावेळ शांतता मिळावी चांगली पुस्तकं वाचताना चांगल्या विचारांची त्यांना साथ मिळावी ताण तणावातून थोडा वेळ का होईना सुटका होऊन पोलिसांची पुस्तकां सोबत मैत्री व्हावी हाच या अभिनव उपक्रमाचा उद्देश असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले.या पुस्तक लायब्ररीमध्ये आरोग्य संबंधीची काही पुस्तके थोर व्यक्तींची चरित्रे काही वैचारिक तर काही कथा कादंबरी यांचा समावेश करण्यात आला. मनसेने भेट दिलेल्या लायब्ररीचे पोलिसांनी देखील कौतुक करत कामातून वेळ मिळेल तसा पुस्तकांचे वाचन करणार असल्याचे सांगितले. या लायब्ररी भेट प्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसेच्या महिला शहर अध्यक्ष डॉ आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, सहसचिव अभिजीत देसाई, अमोल इंगोले, शैलेश भुतडा, दिनेश पाटील, शहर संघटक संदीप गलुगडे, सनप्रीत तुर्मेकर, सागर नाईकरे, किरण सावंत, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, भूषण कोळी, चंद्रकांत मंजुळकर, सागर विचारे, अभिलेश दंडवते, चंद्रकांत डांगे, नितीन नाईक, विशाल चव्हाण, सुहास मिंडे, उमेश गायकवाड, अक्षय भोसले, विनोद पाखरे उपस्थित होते.


Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image