८१ वर्षीय आईने आपल्या ५४ वर्षीय मुलाला एक किडनी केली दान, नवी मुंबईत तीन वर्षात २०० हुन अधिक किडनी ट्रान्सप्लांट केले

नवी मुंबई :- अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट्सचा देखील यामध्ये समावेश असल्याने हे यश अधिक जास्त कौतुकास्पद आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट्सच्या अनुभवी टीमने २०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्स केले किडनी ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९% पेक्षा जास्त आहे आणि गुंतागुंतीची ट्रान्सप्लांट्स देखील यशस्वीपणे केली गेली आहेत, ज्यामध्ये एबीओ-इन्कॉम्पॅटिबल (मिसमॅच ब्लड ग्रुप) ट्रान्सप्लांट्स आणि रिपीट (दुसऱ्यांदा) ट्रान्सप्लांट केसेसचा देखील समावेश आहे. एक अतिशय हृदयस्पर्शी केस एका ८१ वर्षांच्या महिलेची होती, त्यांनी आपल्या ५४ वर्षांच्या मुलाला आपली एक किडनी दान केली. ही एक एबीओ-कॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट केस होती आणि दाता व प्राप्तकर्ता यांच्या तब्येती पूर्णपणे ठीक झाल्या व ८१ वर्षांच्या दाता महिलेच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही. अपोलो नवी मुंबई हे रीनल ट्रान्सप्लांट सेंटर केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्ता व आशेचा मोठा किरण आहे. कोविडच्या केसेस कमी होऊ लागल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील प्रतिबंध शिथिल केले जाताच मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल पुन्हा सुरु झाले.१५ परदेशी रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्या.

                      अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट रोबोटिक युरॉलॉजिस्ट आणि रीनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.अमोलकुमार पाटील यांनी सांगितले, "अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये सर्जिकल तंत्रज्ञानाचे सतत अपग्रेडेशन केले जाते, आजच्या काळात कमीत कमी इन्व्हेसिव्ह तंत्र सर्वात जास्त वापरली जातात. यामुळे सर्जरीनंतर होणाऱ्या वेदना अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवता येतात, रुग्णाची तब्येत लवकरात लवकर बरी होते आणि शरीरावर सर्जरीच्या खुणा देखील राहत नाही आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानासह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या परिणामांचे असे पर्याय उपलब्ध आहेत जे जगातील सर्वोत्कृष्ट पर्यायांच्या तोडीचे आहेत. सकारात्मक क्लिनिकल परिणाम आणि जागतिक स्तरावरील अनुभवांमुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे भारत आणि जगभरातील रुग्णांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनले आहे."अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे रिजनल सीईओ वेस्टर्न रिजन संतोष मराठे यांनी सांगितले, "भारतात पहिली ऑर्गन ट्रान्सप्लांट रजिस्ट्री विकसित करण्यापासून भारतातील काही महत्त्वाच्या किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यापर्यंत, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामार्फत सक्षम ट्रान्सप्लांट सर्जरीसह दर्जेदार परिणाम प्रदान करण्यात नेहमी आघाडीवर आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये किडनी ट्रान्सप्लांट टीमचे नेतृत्व देशातील काही सर्वोत्तम व अनुभवी ट्रान्सप्लांट सर्जन्स करत आहेत. टीमला विविध क्षेत्रातील विशेषज्ञांचे सहकार्य मिळते, ज्यामध्ये नेफ्रोलॉजिस्ट्स, युरॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, सामाजिक कार्यकर्ते, मनोवैज्ञानिक आणि एनेस्थिसियोलॉजिस्ट यांचा समावेश आहे, ही टीम जगभरातील सर्वोत्कृष्ट परिणामांच्या तोडीचे परिणाम प्रदान करते. आम्हाला आमच्या सेवांच्या पोर्टफोलिओमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सेंटरमार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या विशिष्ट सेवांचा अभिमान वाटतो." 

Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळात एकूण १५ निर्णय घेण्यात आले., ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटींचा प्रकल्प , पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प , बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद 3 ऑक्टोबर रोजी
Image