राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा

नवी मुंबई - सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन दरबारी व सुरक्षा रक्षक मंडळ दरबारी व्यथा मांडणाऱ्या राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून २१ मार्च रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून या नवीन संघटनेच्या नावाची घोषणा करण्यात आली.राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक व जनरल माथाडी कामगार सेना या संघटनेची नव्याने नोंदणी करण्यात आली असून गुढीपाडवा या नवीन वर्षाचे औचित्य साधून या सेनेची नवीन महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष योगेश महाजन यांनी जाहीर केले आहे.यापूर्वी सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात संघटनेच्या वतीने सुरक्षा रक्षक मंडळ दरबारी पाठपुरावा सुरु असून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्यात येणार असल्याचे योगेश महाजन यांनी जाहीर केले आहे.भ्रष्टाचार मुक्त मंडळासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

               बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे राज्यातील सर्वात मोठे समजले जाणारे मंडळ असून याच मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.नुकतेच क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे सन्मवयक सतीश राठोड यांनी १९ दिवस आमरण उपोषण केले तर मनसेनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.यापूर्वीही अनेक संघटनेच्या नेत्यांनी आझाद मैदानावर आंदोलने केले तरी आजही सुरक्षा रक्षकांचे प्रश्न प्रलंबितच आहेत.त्यामुळे अश्या लढवय्या तमाम सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन पुन्हा एकदा सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आक्रमक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा यावेळी योगेश महाजन यांनी दिला आहे.सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ व रायगड सुरक्षा मंडळ मधील वेटिंग वरील रक्षकांना लवकरात लवकर काम मिळावे यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.यापुढे आता संपूर्ण राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करत तमाम सुरक्षा रक्षक मंडळातील वंचित कामगारांना काम मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image