२१ वर्षीय रुग्णाची किडनी 'ग्रीन कॉरिडॉर' मार्फत लखनौला रवाना,दोन वैद्यकीय संस्था एसजीपीजीआय - अपोलोमेडिक्स यांच्या दरम्यान ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला


२१ वर्षीय रुग्णाची किडनी 'ग्रीन कॉरिडॉर' मार्फत लखनौला रवाना 

दोन वैद्यकीय संस्था एसजीपीजीआय - अपोलोमेडिक्स यांच्या दरम्यान ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला

नवी मुंबई :- अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स ही खाजगी संस्था आणि एसजीपीजीआय ही सरकारी संस्था यांच्या दरम्यान लखनौमध्ये पहिल्यांदाच 'ग्रीन कॉरिडॉर' अर्थात विशेष वाहतूक मार्ग निर्माण करण्यात आला असून, एका ब्रेनडेड झालेल्या २१ वर्षीय रुग्णाची किडनी या ग्रीन कॉरिडॉरवरून लखनौच्या अपोलोमेडिक्स हॉस्पिटल्समधून एसजीपीजीआयला पाठवली. 

             एसजीपीजीआयमध्ये भरती असलेल्या एका रुग्णावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी लखनौच्या दोन वैद्यकीय संस्था एसजीपीजीआय आणि अपोलोमेडिक्स हॉस्पिटल्स यांच्या दरम्यान बुधवारी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला.खाजगी वैद्यकीय संस्था अपोलोमेडिक्स हॉस्पिटल्समधील ब्रेन डेड झालेल्या २१ वर्षीय रुग्णाची किडनी रुग्णवाहिकेमधून दुपारी एसजीपीजीआयला नेली. एसजीपीजीआयला पोहोचल्यावर तेथील डॉक्टर ती किडनी एका ३५ वर्षीय महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली. एक २१ वर्षीय तरुण रुग्ण १० मे रोजी ब्रेन डेड झाला असल्याची माहिती एसपीजीआय मधील डॉक्टरांना मिळाली. किडनी सुरक्षितपणे आणि योग्य वेळेत पोहोचवली जावी यासाठी एसजीपीजीआय मधील वैद्यकीय तज्ञांनी अपोलोमेडिक्सला येऊन सर्व पाहणी केली.


Popular posts
सिडकोच्या इमारत पुनर्बांधणी धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल, १०० % ऐवजी केवळ ५१% सभासदांच्या संमतीने करता येणार इमारतींचा पुनर्बांधणी
Image
पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
Image
८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक , महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
१६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ पार , तरुण यशवंतांचा सत्कार करण्यासाठी विस्तृत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित
Image