आयपीएल मॅच बघण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाडीतून स्टेडियम मध्ये प्रवेश, डी वाय पाटील प्रशासनाने उघडकीस आणला प्रकार

आयपीएल मॅच बघण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाडीतून स्टेडियम मध्ये प्रवेश

डी वाय पाटील प्रशासनाने उघडकीस आणला प्रकार

नवी मुंबई :- डी वाय पाटील स्टेडियम मधील आयपीएल मॅच बघण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मित्र, नातेवाईक अथवा लहान मुले यांना चक्क फायर ब्रिगेडच्या गाडीमधील इंजिनमध्ये बसवुन स्टेडियम मध्ये मॅच बघण्यासाठी नेल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असता अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
              डी वाय पाटील स्टेडियम मध्ये २७ मार्च पासून आयपीएलचे सामने सुरु आहेत.यावेळी खासगी सुरक्षा रक्षकांसह नवी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.स्टेडियम मध्ये जातांनाही गेटवर तिकीट चेक करूनच आत सोडत असल्याने नवी मुंबई अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आयपीएलची मॅच बघण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली.आपल्या मित्र, नातेवाईक किंवा लहान मुलांना थेट फायर ब्रिगेडच्या गाडीतील फायर इंजिनमध्ये बसवून स्टेडियममध्ये प्रवेश दिला.गेले अनेक दिवस हा प्रकार सुरु असतांना सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यावर गैरकृत्य करणाऱ्या अश्या या कर्मचाऱ्यांवर चपराक बसावी म्हणून नवी मुंबई मनपाचे विभागीय अग्निशमन अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना आदेश जारी केला.की नेरुळ डी वाय पाटील स्टेडियम मध्ये सुरु असलेल्या आय पी एल क्रिकेट मॅच बंदोबस्ताकरिता असणारे विभागातील कर्मचारी हे आपले मित्र, नातेवाईक किंवा लहान मुलांना मॅच पाहण्यासाठी थेट फायर इंजिनमध्ये बसवून स्टेडियममध्ये प्रवेश करीत आहेत.यावर वरिष्ठ पातळीवर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.असा इशारा लेखी स्वरूपात देण्यात आला आहे .यावर कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोट :- डॉ.डी वाय पाटील मधील काही कर्मचाऱ्यांनी वरील प्रकार आमच्या निदर्शनास आणून दिला यावर तत्काळ दखल घेत बंदोबस्त वर असणाऱ्या अग्निशनम कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी करण्यात आला.व पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

शिरीष आराधवड - मुख्य अग्निशमन अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका 
Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image