पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक 

नवी मुंबई :- पोलीस असल्याची बतावणी करून पीडित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.त्या तोतया पोलिसांवर रिव्हॉल्वर चा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी,खंडणी यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.पीडित महिलेसह अजून किती जणांची या तोतया पोलिसाने फसवणूक केली आहे पोलीस याचा तपास करत आहेत.

              गुरुपाल सिंग पहूजा असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव असून तो नेरुळ मध्ये राहणार आहे.त्याच्यावर रिव्हॉल्वर चा धाक दाखवुन,जीवे ठार मारण्याची धमकी देत पीडित महिला तसेच तिच्या बहिणीवर सहकाऱ्यांना बलात्कार करायला सांगेन अशी धमकी देणे,खंडणी स्वरूपात पैसे घेणे असे गुन्हे दाखल आहेत.गुरुपाल पहूजा हा सानपाडा सेक्टर ३०, ब्लीस स्पा या ठिकाणी येऊन त्याच्याजवळील रिव्हॉल्वर चा धाक दाखवुन,जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पीडित महिला यांना त्यांच्या बहिणीवर सहकाऱ्यांच्या माध्यमातून बलात्कार करायला सांगेल अशी धमकी देऊन,पोलीस असल्याचे सांगत त्याच स्पा मधील केबीन मध्ये नेऊन बलात्कार करायचा.त्याच वेळी अश्लील व्हिडिओ बनवुन पीडित महिला यांना वारंवार फोन करून ते व्हिडीओ पती व सोशल मीडियावर प्रसारित करेल अशी धमकी देत पैशाची मागणी करत होता.त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत पीडित महिलेने गुगलपे च्या माध्यमातून १० हजार रुपये गुरुपाल याला पाठवले.त्यावर न थांबता अजूनच त्रास देण्यास गुरुपाल याने सुरु ठेवल्याने अखेर त्याच्या विरोधात पीडित महिलेने सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा सानपाडा या ठिकाणाहून गुरुपाल पहूजा याला  अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पवार यांनी दिली.

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image