१४ महिन्यांच्या बाळाच्या फुफ्फुसातील शेंगदाणा काढण्यात डॉक्टरांना यश, फुफ्फुसातील शेंगदाणा बाहेर काढण्यासाठी 'ब्रोन्कोस्कोपी' प्रक्रिया करावी लागली

 

१४ महिन्यांच्या बाळाच्या फुफ्फुसातील शेंगदाणा काढण्यात डॉक्टरांना यश,

फुफ्फुसातील शेंगदाणा बाहेर काढण्यासाठी 'ब्रोन्कोस्कोपी' प्रक्रिया करावी लागली

नवी मुंबई :- अवघ्या १४ महिन्यांच्या बाळाच्या श्वसनमार्गात अडकलेला शेंगदाणा बाहेर काढण्यात अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या टीमला यश मिळाले आहे. यासाठी त्यांनी केलेली रिजिड ब्रोन्कोस्कोपी तब्बल ३० मिनिटे सुरु होती. या बाळाला जेव्हा अपोलो हॉस्पिटल्समध्ये आणण्यात आले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती, एसपीओ२ ७०-७५% होता आणि तिला हाय फ्लो नेजल कॅनूलावर १०० ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील ईआरमध्ये तिला तातडीने इन्ट्युबेट व व्हेन्टिलेट केले गेले आणि इमर्जन्सी ब्रोन्कोस्कोपी यशस्वीपणे करून तिचे प्राण वाचवले गेले. श्वास घेण्यात त्रास आणि घरघर अशा तक्रारींसह या लहानग्या मुलीला जवळपासच्या वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमध्ये भरती करण्यात आले होते, तिच्यावर एचआरएडी आणि एलआरटीए म्हणून उपचार करण्यात येत होते. तिची कोविड-१९ तपासणी देखील पॉझिटिव्ह आली होती. पण या सर्व उपचारांनंतर देखील तिला होत असलेला त्रास सतत वाढत होता व गंभीर हायपोक्सिया सुरु झाला. तिला लगेचच अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या ईआरमध्ये आणले गेले.  गंभीर स्वरूपाची घरघर, त्रास, श्वसनकार्य टाईप १ पद्धतीने निकामी झालेले अशा तक्रारी तर होत्याच शिवाय ती कोल्ड शॉकमध्ये देखील होती. या बाळाला तातडीने इन्ट्युबेट व व्हेन्टिलेट केले गेले. हेमोडायनॅमिक स्टेबिलायजेशनसाठी तिला फ्लुईड ब्लॉल्यूजेस एफ/बी इनोट्रोपिक इन्फ्युजन्सची देखील गरज होती.  तिच्यावर नेब्युलायजेशन, स्टेरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स अपग्रेडेशन असे उपचार केले गेले.

                   अधिक तपशीलवार तपासणीमध्ये डॉक्टरांच्या लक्षात आले की तिला श्वास घेण्यात त्रास होत होता, प्राणवायूची पातळी कमी झालेली होती आणि तिच्या फुफ्फुसांमध्ये हवेची हालचाल नीट होत नव्हती. हाय पीईईपीवर देखील ९०% ऑक्सिजन सॅच्युरेशन राखणे तिला शक्य होत नव्हते. तिच्या छातीच्या एक्सरेमध्ये गंभीर हायपॉक्सियाप्रमाणे फुफ्फुसांची हालचाल दिसत नव्हती. गंभीर हायपोक्सिया आणि जवळपास तीन आठवडे सतत दिसून येत असलेली लक्षणे हे सर्व विचारात घेता, काहीतरी बाहेरील पदार्थ अडकला असण्याची शक्यता डॉक्टरांना दिसू लागली.  एक सीटी चेस्ट केला गेला आणि त्यामध्ये खात्रीशीररित्या दिसून आले की एक पदार्थ डाव्या मेन ब्रॉन्कसला ब्लॉक करत होता. डॉक्टरांच्या टीमने रिजिड ब्रोन्कोस्कोपी प्रक्रिया करण्यासाठी तातडीने बाळाच्या पालकांकडून उच्च धोक्याची परवानगी घेतली व डाव्या फुफ्फुसाच्या ब्रॉन्कसमधून संपूर्ण शेंगदाणा बाहेर काढला गेला. पण असा एक पदार्थ तिच्या श्वसनमार्गात इतका दीर्घकाळ अडकून होता त्यामुळे  या सर्व प्रक्रिया करून देखील तिचे डावे फुफ्फुस संपूर्णपणे निकामी झालेले होते. प्रक्रियेनंतर बाळाला पीईईपी टीट्रेशन, चेस्ट फिजिओथेरपी, म्युकोलिटिक नेब्युलायजेशन आणि स्टेरॉइड्सची गरज होती. ५ दिवसांच्या ब्रोन्कोस्कोपीनंतर बाळाला यशस्वीपणे एक्सट्युबेट केले गेले. डॉ हेमंत लाहोटी, कन्सल्टन्ट - पेडियाट्रिक सर्जन, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, "मुलांच्या शरीरात अशाप्रकारे काहीतरी पदार्थ, वस्तू जाणे ही खूप जास्त प्रमाणात आढळून येणारी समस्या आहे.  अशी समस्या जीवावर बेतू शकते त्यामुळे निदान करून घेण्यात अजिबात उशीर न करता, तातडीने योग्य उपचार करून घेतलेच पाहिजेत.  रिजिड व्हेंटिलेटिंग ब्रोन्कोस्कोपी ही प्राणरक्षक प्रक्रिया आहे, तज्ञ, कुशल डॉक्टरांनी ही प्रक्रिया केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात.  सर्वोत्तम परिणाम हे फक्त एखाद्या टर्शियरी केयर सेंटरमध्येच मिळू शकतात, जिथे तज्ञांची मल्टिडिसिप्लिनरी टीम उपलब्ध असते." या केसविषयी डॉक्टरांच्या टीमने सांगितले, "या केसमध्ये या बाळाला अनेक वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले होते पण नेमकी समस्या काय ते कुठेही समजू शकले नाही.  गंभीररीत्या हायपोक्सिक मुलावर रिजिड ब्रोन्कोस्कोपी करणे खूप कठीण असते आणि त्यामध्ये जीवाला देखील धोका असतो.  पण क्लिनिकल स्थिती लक्षात घेता हा एकमेव थेरेप्युटिक पर्याय उपलब्ध होता.  त्यामुळे खूप जास्त धोका असणार आहे व त्याला आमची अनुमती आहे अशी परवानगी पालकांकडून मिळवल्यानंतरच प्रक्रिया करण्यात आली."

Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image