अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १२० कर्मचा-यांच्या पदोन्नती, मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांचा कर्मचारी कल्याणकारी निर्णय

नवी मुंबई :- महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजना यांचे लाभ त्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आयुक्तांनी पदोन्नती समितीच्या कामास गती देऊन त्याबाबत सातत्यपूर्ण आढावा घेत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हिताकडे विशेष लक्ष दिले आहे.या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पदोन्नती समितीने शिफारस केल्यानुसार वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक पदावर कार्यरत ३० कर्मचा-यांना सेवा जेष्ठतेनुसार अधिक्षक/वसुली अधिकारी या पदावर तसेच लिपिक-टंकलेखक पदावर कार्यरत असलेल्या ९० कर्मचा-यांना सेवा जेष्ठतेनुसार वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्तांच्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत.

           मागील ब-याच वर्षांपासून हे कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे आज १२० इतक्या मोठ्या संख्येने कर्मचा-यांना पदोन्नतीचा अपेक्षित लाभ मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.कोरोना काळात कोव्हीडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सानुग्रह निधी देणे, कोव्हीड काळात कर्तव्य बजावणा-या कर्मचा-यांना विशेष कोव्हीड भत्ता देणे असे महत्वाचे कर्मचारी कल्याणकारी निर्णय आयुक्तांनी घेतले. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न समजून घेऊन ते तत्परतेने मार्गी लावण्याच्या दृष्टीने नियोजन केले. पदोन्नती समितीला कार्यवाहीसाठी कालमर्यादा निश्चित करून देऊन आयुक्तांनी त्याचा सातत्याने आढावा घेतला.त्यामुळे मागील दीड वर्षात 33 संवर्गात 290 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत. यामध्ये वरिष्ठ पदांपासून संवर्ग 4 च्या पदांपर्यंत सर्व संवर्गांना उचित न्याय मिळेल याची दक्षता घेण्यात येत आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रामुख्याने आया, वॉर्डबॉय, प्लंबर, फिटर अशा वर्ग 4 मधील कर्मचा-यांच्या पदोन्नतीकडे विशेष लक्ष देण्यात आले. पदोन्नती मध्ये आरोग्य, स्वच्छता, लेखा, अभियांत्रिकी, अग्निशमन, शिक्षण, प्रशासकीय सेवा अशा विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांना न्याय देण्यात आला.मागील दीड वर्षात उपआयुक्त पदावर 3, सहाय्यक आयुक्त पदावर 6, कार्यकारी अभियंता पदावर 6, लेखाधिकारी पदावर 3, अग्निशमन केंद्र अधिकारी पदावर 2 पदोन्नत्या झालेल्या आहेत.पदोन्नत्यांमध्ये आज लिपिक-टंकलेखक पदावरून वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक पदावर झालेल्या 90 तसेच वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक पदावरून अधिक्षक/वसुली अधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या 30 अशा 120 कर्मचा-यांच्या पदोन्नत्या या मोठ्या प्रमाणात झालेल्या पदोन्नत्या आहेत. यापूर्वी स्टाफ नर्स संवर्गातून 41 कर्मचा-यांच्या सिस्टर इन्चार्ज पदावर सर्वाधिक पदोन्नत्या झालेल्या होत्या. त्याखालोखाल अधिक्षक पदावरील 23 कर्मचा-यांच्या प्रशासकीय अधिकारी पदावर तसेच 22 उपस्वच्छता निरीक्षकांच्या स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नत्या झालेल्या आहेत.याशिवाय 33 संवर्गातील 372 अधिकारी, कर्मचारी यांना 3 लाभांची सुरक्षित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे व अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत असूनही प्रलंबित असलेले पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, लाड-पागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी असे महत्वपूर्ण निर्णय आयुक्तांनी प्राधान्याने घेतल्यामुळे अधिकारी, कर्मचारीवृंदात आनंदाचे वातावरण असून यामुळे ते अधिक जोमाने काम करतील असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे. 

Popular posts
शिरवणे गावातील बेकायदेशीर लॉजिंगला आशीर्वाद कोणाचा ? , ग्रामस्थांची नाराजी तर मनपाची कारवाईला दिरंगाई
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
केटी ग्रुप, एलके ग्रुप व मिलेनियम इन्फ्रावर कारवाई करण्याची मागणी, सिडको व महारेरा ची फसवणूक, ग्राहकांचे करोडो रुपये परत देण्याची मागणी, कारवाई न झाल्यास सिडको कार्यालयासमोर आत्मदहन
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image