एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन

नवी मुंबई :- कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करून दिवंगत रामचंद्र जोमा पाटील यांच्या नावे वाटप झालेला एमआयडिसीतील १०० चौरस मीटर भूखंड हा प्रल्हाद म्हात्रे नामक व्यक्तीला ट्रान्स्फर करण्यात आल्याचा ठपका ठेवत रामचंद्र जोमा पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी एमआयडीसी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले आहे.भूखंड वाटप प्रकरणात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी.व आमच्या नावे असलेला भूखंड आम्हाला देण्यात यावा यासाठी आम्ही सोमवारी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी बोलतांना सांगितले.

                दिवंगत रामचंद्र जोमा पाटील यांच्या नावाची जमीन एमआयडिसीने संपादित केली असता त्यावर १०० चौरस मीटरचा भूखंड मिळावा म्हणून त्यांचे पुत्र हरिश्चंद्र पाटील यांनी २५ मार्च २००६ रोजी एमआयडीसीत अर्ज केला होता.त्यानुसार १०/०८/२००९ रोजी भूखंड क्रमांक आर ५ हा १०० चौरस मीटरचा भूखंड वाटप करण्यात आला.व त्याचा २९/१०/२०१० रोजी प्राथमिक करारनामा करण्यात आला.त्यांनतर तुळशीदास बापू पाटील यांनी हरिश्चंद्र पाटील यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कुलमुखत्यार पत्राद्वारे ०२/०५/२०११ रोजी त्या भूखंडाची दुय्यम निबंध कार्यालयात १७३१/२०११ नुसार नोंदणी केल्याचा आरोप सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी पत्राद्वारे केला आहे.यानंतर सदरील भूखंड कोणत्याही वारसदाराचा (वारसदाखला) तसेच ना हरकत प्रमाणपत्र न घेता प्रल्हाद म्हात्रे यांच्या नावे वर्ग करण्यात आला व त्याला प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांनी हस्तांतरणाची परवानगी दिली असल्याची सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.सदर बाब निदर्शनास येताच सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी भूखंडासाठी पाठपुरावा केला असता त्यांना एमआयडीसी प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे न्याय मिळावा म्हणून आंदोलनाचा मार्ग स्वीकारत सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी सोमवार पासून एमआयडीसी प्रशासनाविरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचवेळी त्यांनी भूखंड घोटाळ्याप्रकरणी प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी ही केली आहे.त्यांच्याबरोबर टिपणी बनविणारे रोहन कदम असिस्टंट तसेच,ई आर घरत एरिया मॅनेजर हे सुद्धा तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सावित्रीबाई धनाजी साष्टे यांनी केली आहे.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image