नेरुळ विभाग अधिकारी व अतिक्रमण कनिष्ठ अभियंता यांच्यातील वाद चव्हाटयावर, चांगला कनिष्ठ अभियंता देण्याची प्रशासनाकडे मागणी

नवी मुंबई :- अतिक्रमण बांधकाम करणाऱ्या धारकांकडून त्याचबरोबर मार्जिनल स्पेस वरील अनधिकृत व्यावसायिक, फेरीवाले यांच्याकडून स्वतःचा स्वार्थ साधून त्यांना अभय देणाऱ्या नेरुळ विभागातील कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करत एक चांगला अधिकारी नेरुळ विभाग कार्यालयाला देण्यात यावा अशी मागणी नेरुळ विभाग कार्यालय अधिकारी सुनील पाटील यांनी नवी मुंबई प्रशासनाकडे केली आहे.यात जर वेळीच कार्यवाही झाली नाही तर मला या ठिकाणी काम करता येणार नाही अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली आहे.

                 अनधिकृत बांधकामांबाबत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कठोर कारवाया करण्याच्या वारंवार सूचना देउनही नेरुळ विभाग कार्यालयाकडून त्यांचे पालन करण्यात आले नाही.उलट त्यांना अभय देऊन काम कसे पूर्ण होईल याकडे लक्ष केंद्रित केले.ज्याच्याकडून फायदा त्याच्यावर कारवाई नाही आणि ज्याच्याकडून फायदा नाही त्याच्यावर तत्काळ तोडक कारवाई अश्या आशयाचे सूत्रच पुरव यांनी अवलंबल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या.अनधिकृत बांधकामांवर कारवायाबाबत विभाग कार्यालयात तक्रारी दाखल झाल्या असत्या त्यावर तक्रारदारांना रितेश पुरव यांच्याकडून खुलासा करण्यास टाळाटाळ होऊ लागले.अनेक महिने तक्रारदार पाठपुरावा करत असतांना त्याच तक्रारीच्या अनुषंगाने रितेश पुरव यांनी स्वतःचा स्वार्थ साधला असल्याचा प्रकार समोर येऊ लागला.त्यावर नेरुळ विभाग कार्यालय अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे विचारणा झाली असता त्यावेळी तेही हतबल झाल्याने अखेर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न तक्रार दारांसमोर उपस्थित झाला.याचा फायदा अनिधकृत बांधकाम धारकांनी उचलला असता आजमितीस नेरुळ विभागात दोनशेहून अधिक अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे दिसून येत आहे.जर अनधिकृत बांधकाम करायचे असेल तर ३ ते ४ लाख रुपये, मार्जिनल स्पेस वर व्यवसाय करायचा असेल तर ५ ते १० हजार रुपये,हातगाडीवर व्यवसाय करायचा असेल तर प्रति दिन ३०० ते ४०० रुपये असे दर ठरवण्यात आले असल्याची चर्चा नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत सुरु आहे.कोणावर कारवाई करायची आणि कोणावर नाही याचा निर्णय विभाग अधिकारी यांच्या ऐवजी कनिष्ठ अभियंता रितेश पुरव हे स्वतःच घेत असल्याची चर्चाही विभाग कार्यालय हद्दीत जोमाने सुरु आहे.या सर्व प्रकरणात नेरुळ विभाग कार्यालय अधिकारी सुनील पाटील यांचा मनस्ताप वाढल्याने त्यांनी कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांच्या तत्काळ बदलीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला असून जर त्यांची बदली झाली नाही,चांगला अधिकारी मिळाला नाही तर मीच या ठिकाणी काम करणार नाही अशी भूमिका घेण्याचा विचार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे यावर आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Popular posts
विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई, बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image