वाशी हावरे फंटासिया मॉल मधील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई, अनधिकृत बांधकामांमुळे शेकडो जणांचा जीव धोक्यात

नवी मुंबई :- वाशीतील हावरे फंटासिया मॉल मधील काही सदस्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याने मॉल ची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची खंत वाशी फन्टासिया बिझनेस पार्क प्रिमाईसेस सहकारी संस्था,मर्यादितचे अध्यक्ष किरण पैलवान यांनी व्यक्त केली आहे.या संदर्भात वाशी विभाग कार्यालयात लेखी तक्रार केली असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले असल्याचे पैलवान यांनी सांगितले.तक्रारीनुसार मॉल मधील अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त मिळताच तत्काळ कारवाई करण्यात येईल असे यावेळी वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी दत्तात्रय घनवट यांनी सांगितले.

                महावितरण कार्यालयाकडून हावरे फंटासिया मॉल कमिटीला अंतर्गत मीटर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मॉलमधील शेकडो सदस्यांना सुविधा देण्यास अडचण येत आहे,या संदर्भात न्यायालयीन लढा सुरु असून लवकरच तो मार्गी लागेल असा विश्वास पैलवान यांनी व्यक्त केला आहे.मात्र अनधिकृत बांधकामांमुळे मॉल मध्ये येणारी हवा रोखली जात असल्याने भविष्यात एखादी मोठी आगीसारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली.मॉल च्या तळमजल्यावर बेकायदेशीर रित्या गॅरेज सुरु आहे.त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर शेडला चिटकूनच भव्य असे कार्यक्रम हॉल बांधण्यात आले आहेत.छतावरही वैयक्तित बांधणी करण्यात आली आहे.तर मॉल परिसरात कार्यक्रम हॉलच्या धारकांकडून बॅनर बाजी सजावटीकरण करण्यात आले आहे.या सर्व बाबींचा फटका इतर सदस्यांना बसत असल्याने त्यांचे परिणाम कमिटीवर होत असल्याचे पैलवान यांनी सांगितले.येण्याजाण्याचा रस्ताही बंद करण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या संदर्भात वाशी विभाग कार्यालयात लेखी तक्रार देण्यात आली असून अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे.मात्र कारवाई होणार कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकीकडे महावितरणचा त्रास तर दुसरीकडे अनधिकृत बांधकाम धारकांची दादागिरी अश्या संकटात कमिटी सापडली असल्याने मनपा प्रशासनाने यावर तत्काळ पावले उचलणे गरजचे असल्याचे पैलवान यांनी सांगितले.

              


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image