मनपा रूग्णालयातील एनआयसीयू बेड्समध्ये मोठी वाढ केल्याने अधिक उपचार सुविधा उपलब्ध

नवी मुंबई :- महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैदयकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत.यादृष्टीने रूग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग (NICU) आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथे सार्वजनिक रूग्णालये कार्यरत असून बेलापूर येथे  माता बाल रूग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी नवजात अतिदक्षता विभाग (NICU) व लेबर वार्डची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेड्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे.

                यामध्ये सार्वजनिक रूग्णालय वाशी येथील 9 एनआयसीयू बेड्समध्ये भर घालत 24 बेड्स. माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथील 9 एनआयसीयू बेड्सची संख्या वाढवून 24 बेड्स, राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथील 10 एनआयसीयू बेड्सची संख्या वाढवून 22 बेड्स तसेच माता बाल रूग्णालय बेलापूर येथील 4 एनआयसीयू बेड्सची संख्या वाढवून 12 बेड्स अशाप्रकारे आधीच्या एकूण 32 एनआयसीयू बेड्समध्ये 50 बेड्सची भरीव वाढ करीत सद्यस्थितीत 82 एनआयसीयू बेड्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.अशाप्रकारे नवजात अतिदक्षता विभाग (NICU)  व लेबर वार्डमधील बेड्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जास्तीत जास्त नवजात शिशूंवर उपचार करणे शक्य होत आहे.नवजात अतिदक्षता विभागात (NICU) वार्मरचा (Warmer) उपयोग हा प्रसुती कक्षात सुरूवातीच्या काळात नवीन जन्मलेल्या अर्भकाची काळजी घेण्यासाठी तसेच 28 दिवसांवरील कमी वजनाच्या बालकांसाठीसुध्दा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फोटेथेरपी मशीन्सचा कावीळची लक्षणे असलेल्या नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी उपयोग होत आहे.नमुंमपाच्या सार्वजनिक रूग्णालयामध्ये मागील 4 महिन्यात 276 नवजात शिशूंवर उपचार करण्यात आले आहेत. यातील 1 कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाच्या 3 आणि 1 ते 1.2 कि.ग्रॅ. वजनाच्या 9 अशा 12 नवजात शिशूंवर उपचार करून त्यांच्या वजनात वाढ करण्यात आली आहे. ह्दयाशी संबंधित आजार असलेल्या 2 शिशूवर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमी दिवसांच्या 60 बाळावर (preterm babies)  screed and treatment Retinopathy of prematurity (ROP) उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर विविध आजारांकरिता रूग्णालयात दाखल झालेल्या शिशूंवर उपचार करण्यात आलेले आहेत. या कार्यवाहीमध्ये वैद्यकिय अधिक्षक डॉ, उध्दव खिल्लारे, बालरोग तज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे व प्राध्यापक डॉ. संध्या खडसे यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.महानगरपालिकेच्या चार रूग्णालयांतील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) व लेबर वार्ड सुविधांमध्ये 50 बेड्सची मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने तेथील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण झाले असून यामुळे अधिक नागरिकांना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होत आहे. 

Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image