‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी

नवी मुंबई :- ‘स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशात प्रथम क्रमांक मिळावा यासाठी नवी मुंबई मनपाकडून स्वच्छता व सुशोभीकरण यावर जास्त भर देण्यात आला आहे.यासाठी लाखो करोडोंची कामे करण्यात येत असून त्या कामांमाघे होणाऱ्या खर्चावर मात्र मनपा आयुक्त राजेश नार्वेकर याचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.चिरी मिरी कामांसाठी लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास येत असतांनाच झालेल्या कामांवर तब्बल ३० लाखांची निविदा काढण्यात आली असल्याची बाब पत्रकार योगेश महाजन यांनी उघडकीस आणली आहे.सदरील निविदा तत्काळ करण्यात यावी अशी मागणी यावेळी महाजन यांनी मनपा आयुक्त व शहर अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

             ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत शहराच्या विविध भागात रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे.यासाठी विविध विभागाची नेमणूक करण्यात आली असून त्यातील ठाणे - बेलापूर रोड (टी बी आर) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर येत आहे.जी कामे अगोदरच झाली आहेत त्याचे टेंडर मात्र आता काढण्यात आले आहे.(टी बी आर) विभागाअंतर्गत तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली असे पाच रेल्वे स्टेशन रंगरंगोटी करण्याच्या कामासाठी येतात.या पाचही रेल्वे स्थानकांवर काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली आहे.असे असतांनाच ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२/- रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.या कामाच्या निविदा २७ मार्च रोजी उघडण्यात येणार असून त्याच्या कामाचा ६ महिन्याचा कालावधी आहे.टेंडर उघडण्याअगोदरच काम पूर्ण झाले असेल तर हि तब्बल ३० लाखाची निविदा कोणासाठी आणि कश्यासाठी असा प्रश्न यावेळी महाजन यांनी उपस्थित केला आहे.तर सदरील टेंडर तत्काळ रद्द करून कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी योगेश महाजन यांनी केली आहे.सामान्य जनतेच्या कररूपी मिळणाऱ्या पैश्यावर जर कंत्राटदार व अधिकारी ताव मारत असतील तर त्यांचा डाव मोडीत काढण्यासाठी न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा महाजन यांनी दिला आहे. 2023’ च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेचा आढावा घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छताविषयी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही यासाठी विभागवार दौ-यांना सुरुवात केली आहे.त्याच वेळी जर होणाऱ्या कामांचा दर्जा त्यासाठी लागणारा व होणारा खर्च याची चाचपणी केली तर करोडोंचा घोटाळा समोर येईल असा विश्वास यावेळी महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts
नकली दस्तावेज तयार करून देवस्थानच्या इनामी जमिनींची विक्री करण्यासाठी मदत करणारे सरकारी बाबू गजाआड , अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठी या 6 अधिकाऱ्यांसह 32 जणांवर अखेर गुन्हा दाखल
Image
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण न फिटणारे – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर , ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा श्रोत्यांशी संवाद
Image
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत , स्वछ सर्वेक्षण, देखभाल दुरुस्ती, अतिक्रमण घोटाळे आघाडीवर , मुंबई मनपा च्या धर्तीवर नवी मुंबईतील घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?
Image