नवी मुंबई मनपा अग्निशामक विभागात अनेक जवानांची बोगस प्रमाणपत्रे सादर,अग्नी सुरक्षा वाऱ्यावर , तीन अपत्ये नंतर बोगस प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड - आवाज फाउंडेशन

नवी मुंबई :- महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन करण्यात आलेल्या अग्निशमन दलातील अनेक कर्मचाऱ्यांची तक्रार आवाज फाउंनडेशनच्या अध्यक्षा सुषमा मौर्या, फाउंडेशनचे कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड.फिरोज शेख यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली असता त्यावर दोघांवर कारवाई करण्यात आली.अजून इतरांवर कारवाईच्या प्रतीक्षेत असतांनाच पुन्हा एकदा सुषमा मौर्या व अ‍ॅड.फिरोज शेख  यांनी अग्निशामक विभागातील बोगस प्रमाणपत्रांचा गदारोळ चव्हाट्यावर आणला आहे.तर लक्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा रेणुका गायकवाड यांनीही या विषयावर पाठपुरावा केला होता. यात अनेक कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर अथवा होण्या अगोदर बोगस प्रमाणपत्रे सादर केली आहेत,त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हायला हवी,अशी मागणी यावेळी आवाज फाउंनडेशन व लक्ष फाऊंडेशनच्या वतीने नेरुळ येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.यावेळी त्यांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादीही जाहीर केली आहे.

               या यादीत किरण लक्ष्मण अटकरी, विकास उत्तम मोरे, विवेक वसंत पाटील, संतोष भागवत जाधव, संदीप हरिभाऊ नाईक, प्रवीण दत्तात्रय देवकर, महादेव काशिनाथ गावडे, राकेश आनंदा वाडीले, दिलीप नागू पवार, चैत्राम भटू चौधरी, सुधीर प्रताप गावित, जितेंद्र भटू भोई, सुनील शंकर गावित यशवंत राजमल चौरे, उमेश शांताराम जुनघरे, निलेश नथुराम चव्हाण, अशोक सोनबा धोत्रे, सतीश पोपट बोऱ्हाडे यासह इतरांचाही समावेश आहे. आवाज फाउंनडेशनच्या अध्यक्षा सुषमा मौर्या, फाउंडेशनचे कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड.फिरोज शेख यांनी नेरुळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सदर बाब उघडकीस आणली आहे.प्रशासन जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करत असल्याने या विरोधात आवाज फाउंडेशनने न्यायालयात (पीआयएल) जनहित याचिका दाखल केली असल्याचे सुषमा मौर्या यांनी सांगितले.स्वच्छतेसह इतर अनेक मानांकने मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला मात्र ग्रहण लागले आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात अग्निशमन सेवा पुरवणाऱ्या अग्निशमन दलात अग्निशमन पदावर कार्यरत असणाऱ्या सुमारे २०० अग्निशमन जवानांपैकी २३ जवानांकडे आगीवर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन बाबत असलेल्या ट्रेनिंगची प्रमाणपत्रेच नाहीत त्यातील अनेकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत.महाराष्ट्रात सर्व महापालिका,एमआयडीसी, सिडको, व खाजगी व्यवस्थापनामध्ये अग्निशामक पदावर नियुक्ती करताना राज्य अग्निशमन ट्रेनिंग सेंटर मार्फत चालवले जाणारे ट्रेनिंग घेणे अनिवार्य आहे व हे ट्रेनिंग असल्याशिवाय नियुक्ती करता येत नाही.आवाज फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा मौर्य यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीवरून नवी मुंबई अग्निशमन दलात सुमारे 23 कर्मचारी हे कोणतेही अधिकृत ट्रेनिंग न घेता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे पालिकेत कार्यरत आहेत.कोणतेही ट्रेनिंग नसलेले अग्निशामक किरण अटकरी यांना तर पालिकेने पुढील पदोन्नतीसाठी ट्रेनिंगला देखील पाठवले आहे.महापालिकेत रुजू होते समयी जड वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील मधुकर गोळे यांना सेवेत रुजू करून त्यांनाही पुढील पदोन्नतीसाठी पालिकेने सुमारे पाच लाख खर्च करून ट्रेनिंग दिले.आज मीतीस नवी मुंबईच्या कर दात्यांची अग्निसुरक्षा महापालिकेने वेशीवर टाकल्याचे दिसते.या सर्व अग्निशमन जवानांवर येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास तात्काळ नवी मुंबईतील करदात्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अग्निशमन दल व नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या अध्यक्ष सुषमा मौर्य व लक्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा रेणुका गायकवाड यांनी नेरूळ येथे पत्रकार परिषदेत दिली

Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत , स्वछ सर्वेक्षण, देखभाल दुरुस्ती, अतिक्रमण घोटाळे आघाडीवर , मुंबई मनपा च्या धर्तीवर नवी मुंबईतील घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?
Image
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार, सर्वेक्षण यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगारी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या, अचूक, कालबद्धपणे काम व्हावे , चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Image