“आयुष्य हे बागडण्याचं क्रीडांगण नसून झुंज देण्याचं रणांगण आहे” - ॲड. उज्ज्वल निकम , ‘मराठी पाऊल पडते पुढे’ .... ५ मे रोजी प्रदर्शित होणार

नवी मुंबई :- “आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. मी जेव्हा 1993 बॉम्बस्फोट खटल्यानिमित्त मुंबईत आलो. तेव्हा बॉम्बस्फोट खटला हा एक संघटीत गुन्हेगारीची केस होती त्यामुळे ह्या एवढ्या मोठ्या शहरात आपला निभाव लागेल का? अशी माझ्या मनात भिती होती. पण, जिद्द आणि संघर्षाचं व्रत घेतलं आणि यशस्वी झालो. मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. संगीतही श्रवणीय आहे. शीर्षकगीत मनाला प्रेरणा देणारे आहे. आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली होऊ शकत नाही. पण, संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आणि हीच प्रेरणा मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटातून मिळेल, असा मला विश्वास आहे. निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्ह्यातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.” असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले.

                    मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकऱ्या देणारा होऊ शकतो आणि ह्या महाराष्ट्रात केवळ आणि केवळ मराठी माणसाचाच डंका वाजला पाहीजे, असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी मला आशा आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही सुरेश हावरे यांनी ह्या प्रसंगी दिली.मराठी पाऊल पडते पुढे या शीर्षकातच मराठी माणूस सुध्दा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे, हे स्पष्ट होते. निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. त्यावेळी मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो,हे प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे.“पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अत्यंत आदराचे स्थान आहेच. पण, माझ्या साठी ते निस्वार्थ समाजसेवेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्यासारख्या आदर्शव्यक्ती हस्ते माझ्या चित्रपटाचे संगीत प्रकाशित झाले, हे माझे भाग्य आहे. त्यांच्या प्रेरणेने मी मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून येणारा निव्वळ नफा हा दहा टक्के चित्रपटातील कलाकारांना व उर्वरीत भाग मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी, वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे, म्हणून हा चित्रपट आपण आवर्जून पाहावा. लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५४४११३३ या क्रमांकावर मिस कॉल द्या, असे आवाहन निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्निल मयेकर यांनी लेखन दिग्दर्शन केले आहे. मराठी पाऊल पडते पुढे हया चित्रपटात मुख्य नायकाच्या भुमिकेत ८३ हया बॉलिवूड चित्रपटात झळकलेला आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आहे. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर...’ ह्या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे मुख्य नायिकेच्या भुमिकेत आहे. ‘मराठी पाउल पडते पुढे’ हया चित्रपटाद्वारे चिराग आणि सिद्धी ही जोडी पहिल्यांदाच रोमॅटीक मुडमध्ये पाहायला मिळणार आहेत. यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुलकर्णी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीतकार रेश्मा कारखानीस, किरण पाटील, कृपेश पाटील आणि प्रवीण माळी यांच्या गीतरचनांना संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी संगीतबदध केले आहे. त्यावर स्वप्निल बांदोडकर, धनंजय सरतापे, निमिषा बाविस्कर, मयूरा खोले आणि प्रवीण माळी यांनी स्वरसाज चढवला आहे.प्रथमच हया चित्रपटात अहिराणी गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image