नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?

नवी मुंबई :- बदली थांबवण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये घेण्यात आल्याची घटना नुकतीच मनपाचे काही दिवसात सेवानिवृत्त होणारे अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या दालनात घडून आल्याने एकच खळबळ माजली आहे.अगोदर अतिक्रमण घोटाळा मग नंतर बदली घोटाळा समोर आल्याने मनपा नेमकं कशात नंबर वन आहे याची चर्चा शहरात सुरु आहे.स्वछ सर्वेक्षण मध्येही मोठा घोटाळा झाल्याचे समोर येत असतांनाच मनपा आयुक्त राजेश नार्वेकर हे नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम आणणार की भ्रष्टाचारात नंबर पटकवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

                नेरुळ विभाग कार्यालयातील वसुली अधिकारी म्हणून ओळख असलेले अतिक्रमण अधिकारी यांनी अगोदरच पालिकेची प्रतिमा खराब केली असून अजून एका प्रकरणात त्यांनी मनपाची प्रतिमा चव्हाट्यावर आणली असल्याचे दिसून आले आहे.मनपाच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचा अतिक्रमण विभाग अगोदरच भ्र्रष्टाचाराच्या विळख्यात असून या विभागाच्या माध्यमातून कारवाई कमी आणि वसुली जास्त होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.काही दिवसात ते सेवानिवृत्त होत असल्याने कोणत्याही विभागात कारवाया होणार नाही,फक्त प्रत्येक विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागातील वसुली अधिकाऱ्यांकडून मिशन वसुली राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे.त्यातच आता बदलीसाठी लाखो रुपयांची अफ़रातफ़र होत असल्याची बाब समोर आली आहे.मात्र या भ्र्रष्टाचाराच्या गराड्यात एका सामान्य कर्मचाऱ्याचा बळी गेल्याने मनपात खळबळ माजली आहे.नेरुळ विभाग कार्यालयातील भ्र्रष्टाचार अनेक वेळा लेखी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यापुढे मांडला असता त्यांनीही आजतायागत कारवाईच्या नावाखाली वेळकाढू पणा केला आहे.त्याचवेळी स्वछ सर्वेक्षणात झालेला भ्र्रष्टाचार नार्वेकर यांच्यासमोर मांडला असता त्यावरही त्यांना अद्याप ठोस कारवाईचे पाऊले उचललेले नाहीत.यावरून भ्र्रष्टाचाराची पाळेमुळे आयुक्तांपर्यंत तर पोहोचत नाहीत ना असा प्रश्न समाजसेवक योगेश महाजन यांनी उपस्थित केला आहे.नवी मुंबई महापालिका हे घोटाळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात असतांनाच अखेर त्यावर वचक ठेवणार कोण. सामान्य नागरिकांचा कररुपी पैसा हा भ्र्रष्टाचाराच्या माध्यमातून मनपात खाल पासून वर पर्यंत जात असल्याने आता यापुढे नागरिकांनीच अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्याची गरज असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले.


Popular posts
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एम आय डी सी कडून नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप - चौकशीची मागणी 
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य
Image