वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार

नवी मुंबई :- महानगरपालिकेशी संबंधित कामांबाबत नागरिकांचा नियमित संपर्क विभाग कार्यालयांशी असतो. त्या अनुषंगाने विभाग कार्यालयामध्ये जाऊन तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सुरुवात केली असून शुक्रवारी त्यांनी बेलापूर विभाग कार्यालयाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.त्याचवेळी अनधिकृत बांधकामाचा ही आढावा घेतला तर प्रत्येक विभागातून मोठा भ्रष्टाचार समोर येईल.कारण गेल्या अनेक महिन्यांपासून बहुतांश तक्रारदारानी अनधिकृत बांधकाम संदर्भात विभागवार निवेदन दिले असून त्यावर कारवाई होण्याऐवजी फक्त सेटलमेंट झाली असल्याचे दिसून आले आहे.याचाही आढावा जर मनपा आयुक्तांनी विभागवार घेतला तर भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी आयुक्ताना यश मिळेल असे मत समाजसेवक योगेश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

                प्रत्येक विभागात तक्रार दारांनी गेल्या वर्षभरात अनधिकृत बांधकाम संदर्भात किती निवेदने दिली,त्यातील किती मार्गी लागली, आणि जे मार्गी लागले नाहीत, ते का लागली नाहीत याचा आढावा आयुक्तांनी घेतला तर भूमाफियांवर वचक बसेल असे मत योगेश महाजन यांनी व्यक्त केले आहे.विभाग कार्यालयांसाठी महानगरपालिकेच्या आकृतीबंधात मंजूर झालेला अधिकारी, कर्मचा-यांचा आराखडा जाणून घेत प्रत्यक्षात विभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या कर्मचा-यांची आयुक्तांनी बारकाईने माहिती घेतली. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप जाणून घेत आयुक्तांनी सर्वच विभाग कार्यालयातील विद्यमान स्थितीची माहिती घेतली.बेलापूर विभागात सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती घेत आयुक्तांनी किती कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार याचीही माहिती जाणून घेतली. पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने बेलापूर विभागात सुरु असलेल्या नालेसफाई, बंदिस्त गटारे सफाई, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई कामांचा आयुक्तांनी परिसरनिहाय आढावा घेतला व काम झाल्यावर त्याठिकाणची झाकणे व्यवस्थित लावली जातील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. या कामाची जबाबदारी संबंधित भागाचा कनिष्ठ अभियंता व स्वच्छता अधिकारी यांच्यावर निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी केल्या. नालेसफाई कामांची सद्यस्थिती जाणून घेताना ही कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विशेषत्वाने सेक्टर 4, 5, 6 येथील नाल्याची सफाई अधिक काळजीपूर्वक करण्याचे निर्देश देत त्याठिकाणी 2-4 दिवसात कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.मुसळधार पाऊस आणि मोठ्या भरतीची वेळ जमून आल्यास पावसाळ्यात शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते अशी 14 ठिकाणे शहरात असून त्यांची सविस्तर माहिती घेत त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवावी व पाणी साचून राहणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामामुळे पावसाळी कालावधीत त्या आसपासच्या परिसरात पाणी साचणार नाही याची खातरजमा करून घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिघा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व परिमंडळ उपआयुक्तांना देण्यात आल्या.विभागातील इलेक्ट्रीकल डिपी यांचे दरवाजे व्यवस्थित बंद असतील तसेच उघड्या केबल्स झाकलेल्या असतील याची खात्री विभागातील विदयुत अभियंता यांनी करून घ्यावी व एमएसईडीसीएल मार्फत आवश्यक कामे करून घ्यावीत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय सर्वेक्षणाच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देशित करतानाच सर्व संबंधित घटकांनी चेकलिस्टप्रमाणे प्रत्येक बाबीची नियमित तपासणी करावी व आवश्यक बाबींची पूर्तता करावी अशा सूचना केल्या. शौचालयांच्या स्वच्छतेकडे तसेच वाणिज्य भागाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.केंद्र सरकारच्या सूचनांनुसार 5 जूनपर्यंत ‘21 डेज चॅलेंज' 'थ्री आर' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे  आयोजन करावयाचे असून त्यामध्ये लोकसहभागाला विशेष प्राधान्य द्यावयाचे असल्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.विभाग अधिकारी हा आपल्या विभाग क्षेत्राचा प्रमुख असून त्याचे विभागातील प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष हवे ही अपेक्षा व्यक्त करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभाग कार्यालये सक्षमीकरणावर भर देण्याच्या दृष्टीने तेथे प्रत्यक्ष जाऊन व तेथील कामकाजाचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे व त्यादृष्टीने विभाग कार्यालयातील आढावा बैठकींना सुरुवात केली आहे.

Popular posts
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत , स्वछ सर्वेक्षण, देखभाल दुरुस्ती, अतिक्रमण घोटाळे आघाडीवर , मुंबई मनपा च्या धर्तीवर नवी मुंबईतील घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार, सर्वेक्षण यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगारी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या, अचूक, कालबद्धपणे काम व्हावे , चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Image
शिरवणे गावातील बेकायदेशीर लॉजिंगला आशीर्वाद कोणाचा ? , ग्रामस्थांची नाराजी तर मनपाची कारवाईला दिरंगाई
Image