नाशिक ग्रामीण व शहर गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर अवैध व्यवसाय, ऑनलाईन लॉटरी यांना आशीर्वाद कोणाचा ?

 

नाशिक (रेणुका गायकवाड - महाले) :- राज्याच्या गृहमंत्र्यांनी गत वर्षी विधानसभेमध्ये बोलतांना अवैध पद्धतीने ऑनलाईन लॉटरी चालवून शासनाचा टॅक्स बुडवणाऱ्या व्यवसायिकांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कडक निर्देश दिले होते.असे असतानाही नाशिक जिल्ह्यामध्ये राजरोसपणे ऑनलाईन लॉटरी सुरू आहे.याच ऑनलाईन खेळासाठी अनेकांनी आत्महत्याही केल्या असल्याच्या घटना नाशिकमध्ये उघडकीस आल्या आहेत.तरीही पुन्हा मोठ्या प्रमाणात नाशिक ग्रामीण / शहरात अवैध व्यवसाय सुरु झाल्याने अनेकांचे जीव गेल्यावर पोलीस प्रशासन जागे होणार का अशी चर्चा नाशिक मध्ये सुरु आहे.
          गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतर नाशिक शहरातील अवैध ऑनलाईन लॉटरी चालकांनी व्यवसाय तेजीत सुरु केल्याने गृहमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिल्याचे दिसून येत आहे.गेल्या २ महिन्यामध्ये नाशिक शहर भागामध्ये नवीन ११ व ग्रामीण भागामध्ये नवीन १३ दुकाने सुरू झाल्याचे निदर्शनात आले आहे.यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर गुन्हेगारी पुन्हा मोठ्या प्रमाणात उफाळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.पोलीस प्रशासनाकडून सदर अवैद्य लॉटरी चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे विधान तर गृहमंत्र्यांनी केले परंतु पोलीस प्रशासनातीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अवैध लॉटरी चालक राजरोसपणे अवैध लॉटरी चा धंदा करीत असल्याची चर्चा आहे. प्रशासनातील वरदहस्त असलेले अधिकाऱ्यांना जवळ करून सदर अवैध लॉटरी चालक अधिकाऱ्यांचे वाढदिवस व छोटे मोठे कार्यक्रमचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात व आपण त्यांच्या किती जवळचे आहोत व पोलीस प्रशासन आपले काहीच करू शकणार नाही अशा भयमुक्त वातावरणामध्ये बिनधास्तपणे शासनाचे निर्देश पायदळी तुडवत रोज लाखोंची उलाढाल ह्या अवैद्य ऑनलाईन लॉटरी व्यवसाय मार्फत करत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन महिन्यांमध्ये नाशिक शहरांमध्ये नवीन ११ ऑनलाइन लॉटरीचे अवैध्य दुकाने उदयास आली आहेत तर नाशिक ग्रामीणचे शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या येण्यामुळे गेल्या काही महिन्यापासून बंद झालेल्या ग्रामीण भागातील अवैध ऑनलाईन लॉटरी उद्योगही पुन्हा नव्याने सुरू झाले आहेत.ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. शहराप्रमाणेच नाशिक ग्रामीण भागातील मालेगाव मध्ये ५ मनमाड मध्ये ३ नांदगाव येथे २ आणी इतर प्रत्येकी १ नवीन अवैद्य लॉटरी सेंटर सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या जीएसटी धोरणानुसार ऑनलाईन लॉटरी वर २८% जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यामुळे २०१९ च्या अखेरीस शासनमान्य असणाऱ्या लॉटरी कंपन्यांनी मार्केटमध्ये या व्यवसायातून माघार घेतली, ज्याचा दुष्परिणाम म्हणून अवैध ऑनलाईन लॉटरी करणाऱ्यां कंपन्यांचा सुळसुळाट संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरू झाला.वेगवेगळ्या नावाने छोट्या मोठ्या कंपन्या बनवून व कायद्याच्या पळवाटा शोधून अनेक रुस्तुमाने महाराष्ट्र मध्ये अवैद्य पद्धतीने ऑनलाईन लॉटरीचे बस्तान बसवले व शासनास जीएसटी न देता स्थानिक पातळी वर चिरीमिरी देऊन प्रत्येक शहरामध्ये ऑनलाईन लॉटरीचे जाळे पसरवले.नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ऑनलाईन गेम ऑनलाईन लॉटरी यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केली आहे व स्वतःचे घरदार संपत्ती विकून देशोधडीला लागले आहेत.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने सदर व्यवसायिकांवर कडक कारवाई करावी असे निर्देश दिले होते व जनतेने अशा जुगारापासून लांब राहावे अशी कळकळीने विनंती केली. परंतु पैशाच्या जोरावर अवैध ऑनलाईन लॉटरी व्यवसायिकांनी शासनास दिलेली ही चपराक म्हणजे कायदा व सुव्यवस्था यांचे निघालेले धिंडवडे आहे. जर सरकार असल्या अवैध ऑनलाईन लॉटरी व्यवसायिकांवर कारवाई करण्यास अपयशी ठरत असेल तर नवीन जुगार विषयक कायदे व धोरणांची अंमलबजावणी कशी करणार याच्यावर प्रश्नचिन्ह आहे.
Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image