अनधिकृत बांधकामांसाठी नवी मुंबई मनपाचा प्रति मजला ५ लाखांचा दर ? , अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नवी मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामे ? , कारवाईच्या नावाखाली लाखो रुपयांच्या सेटलमेंट ? , तुर्भे व नेरुळ विभाग कार्यालय सेटलमेंट मध्ये आघाडीवर

नवी मुंबई (योगेश महाजन) :- अनधिकृत इमारत बांधण्यासाठी प्रति मजला ५ लाख द्या,आणि बिनधास्त बांधकाम करा,कितीही तक्रारी आल्यास आम्ही त्यांना सांभाळून घेऊ असा फतवाच जणू काही अनधिकृत बांधकाम धारकांसाठी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून काढण्यात आला आहे ही काय असा प्रश्न सध्या अनधिकृत इमारतींच्या बांधकामांची तक्रार करणाऱ्या तक्रार दारांना पडला आहे.कारण तक्रार केल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या मुख्य कार्यालय ते विभाग कार्यालय अधिकारी यांच्या कडून मिळणाऱ्या तक्रार दारांच्या पदरी आश्वासने व निराशाच पडत असल्यामुळे.अनधिकृत बांधकामे हि नवी मुंबई अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी ठरली असून त्यावर हातोडा चालवण्याऐवजी आपलं घर चालवायचं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून मौजमस्ती करायची असा उपक्रमच सुरु असल्याचे सध्या स्थितीत दिसून येत आहे.

                     नवी मुंबई मनपाचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर हे सध्या ठाणे मनपात आयुक्त असून त्यांनी सध्या अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनधिकृत बांधकामांना पाणी आणि लाईट पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बांगर यांनी धारेवर धरल्याने तेथील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. तर त्याचवेळी न.मु.म.पा च्या अतिक्रमण विभागातील मुख्य कार्यालय ते विभाग कार्यालय सेटलमेंट करण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.नेरुळ व तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तर तक्रारदारांना फसवण्यात हद्दच पार केली आहे.अनधिकृत बांधकामे व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी त्यांना काम पूर्ण होण्यासाठी पाठबळ कसं मिळेल याची खबरदारी घेतली जात आहे.तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील सानपाडा गाव व तुर्भे गाव या ठिकाणी सुरु असलेल्या अनधिकृत कामांबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.त्या तक्रारींना केराची टोपली दाखवत तुर्भे विभाग कार्यालयाकडून उलट जोमाने अनधिकृत बांधकामे करून घेतली जात आहेत.तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व फेरीवाले आहेत.त्या सगळ्यांकडून प्रतिमहिना मोठी रक्कम घेतली जात असल्याची चर्चा आहे.फेरीवाले, मार्जिनल स्पेस, तसेच अनधिकृत बांधकाम धारक यांच्याकडून प्रति महिना लाखो रुपयांचे कलेक्शन होत असल्याची चर्चाही विभाग कार्यालय हद्दीत आहे.त्यामुळे कितीही तक्रारी आल्या तरी त्यावर कारवाया होत नसल्याची बाब सध्या दिसून येत आहे.नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत सारसोळे गाव, शिरवणे गाव, नेरुळ गाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.या विभागातील अधिकारी कारवाई करण्याऐवजी लाखो रुपये मागत असल्याची बाब यापूर्वीच भाजप नेते गणेश नाईक यांनी निदर्शनास आणून दिली आहे.भाजप चे व नवी मुंबई शहराचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शिरवणे गावातील राहत्या घराच्या माघील बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून त्यावर का कारवाई होत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मनुष्यबळाच्या नावाखाली अधिकारी एकीकडे वेळ मारून नेत असून दुसरीकडे मात्र लाखो रुपये घेऊन बांधकामांना अभय देण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले आहे.मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच भ्रष्टाचाराचा तांडव सुरु झाला आहे.विविध तक्रार दारांच्या माध्यमातून विविध भ्रष्टाचार उघडकीस आले असून त्यावर तोडगा काढण्यास मात्र नार्वेकर यांना अपयश आल्याचे दिसून आले आहे.स्वछ सर्वेक्षण घोटाळ्याची आजही चौकशी सुरु असून ती पूर्ण कधी होणार यावर मात्र आजही प्रश्न चिन्ह आहे.ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी अनधिकृत बांधकामांबाबत स्पष्ट केले की शहरात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे आपल्यासाठी भूषणावह नाहीत.प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे.अनधिकृत बांधकामांना पाणी, वीज यांची नवीन जोडणी मिळणार नाही याची खबरदारी घ्या. अनधिकृत बांधकामांना नवीन पाणी जोडणी मिळाली तर कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई होणार.असा इशाराच त्यांनी दिला असल्याने भूमाफियांमध्ये खळबळ माजली आहे.याच धर्तीवर नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही आक्रमक होणे गरजेचे असल्याचे तक्रार दारांकडून सांगण्यात येत आहे.

Popular posts
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image
रूपा इन्फोटेक अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एम आय डी सी कडून नियमबाह्य पद्धतीने भूखंड वाटप - चौकशीची मागणी 
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य
Image