शिरवणे गावातील बेकायदेशीर लॉजिंगला आशीर्वाद कोणाचा ? , ग्रामस्थांची नाराजी तर मनपाची कारवाईला दिरंगाई

शिरवणे गावातील बेकायदेशीर लॉजिंगला आशीर्वाद कोणाचा ?

ग्रामस्थांची नाराजी तर मनपाची कारवाईला दिरंगाई

नवी मुंबई :- अनधिकृत बांधकामांपाठोपाठ आता नवी मुंबई, नेरुळ विभागातील शिरवणे गावात निवासी जागेवर अनधिकृत पणे लॉजिंग बोर्डिंग उभारण्यात येत असल्याने त्या लॉजिंगला ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याची माहिती समाजसेवक जयेंद्र सुतार यांनी दिली आहे.सदरील अनधिकृत बांधकामाची माहिती मनपा विभागाला देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न सुतार यांनी उपस्थित केला आहे.
              डान्स बार, बार रेस्टोरंट, अवैध व्यवसाय, अनधिकृत बांधकामात आघाडीवर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई, नेरुळ विभागातील शिरवणे गावात आता लॉजिंग आणि बोर्डिंग धारकांनी धुमाकूळ माजवला आहे.लॉजिंग बोर्डिंग ची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असून आता निवासी जागेवरच लॉजिंग बांधण्याचे प्रकार सुरु आहेत.याच गावातील भूखंड क्रमांक ३०६ वर सध्या लॉजिंग चे काम सुरु असून या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.जुन्या बांधकामावर नव्याने लॉजिंगचे काम सुरु असल्याची माहिती मिळताच शिरवणे ग्रामस्थांनी बैठक घेत या बांधकामाला विरोध करत सह्यांची मोहीम राबवली.या सर्वांच्या सह्यांचे पत्र नेरुळ विभाग अधिकारी यांना दिले.सदरील बांधकामाला कोणतीही परवानगी नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता या बांधकामावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.तक्रार देऊन विभाग कार्यालयाकडून कारवाईला दिरंगाई होत असलयाने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.शिरवणे गावाच्या आजूबाजूला कोणतेही पर्यटन स्थळ अथवा धार्मिक स्थळ नसतांना इतक्या मोठ्या प्रमाणात लॉजिंग का असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.गेल्या अनेक वर्षात शिरवणे गावाला बार आणि लॉजिंगचा विळखा पडला आहे.या ठिकाणी शहराबाहेरील नागरिक डान्स बार मध्ये मौज मस्ती करण्यासाठी येत असून लॉजिंगचाही वापर मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येतो.बाहेरून येणाऱ्या नागरिकांकडून याचा स्थानिक महिलांनाही त्रास होत असल्याने बाहेर जातांना जीव मुठीत धरून त्यांना फिरावे लागते.अनेक वेळा छेडखाणीचे प्रकार या ठिकाणी घडल्याने हाणामारीचे प्रकारही घडले आहे.नवी मुंबईतील शहर हे येथील ग्रामस्थांच्या जमिनीवर वसले असून ग्रामस्थांनी आजही आपली संस्कृती जपली आहे.हीच संस्कृती बिघडवण्याचे काम डान्स बार, बार रेस्टोरंट, अवैध व्यवसाय,अनधिकृत बांधकामधारक करत असल्याने भविष्यात ग्रामस्थांची संस्कृती संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image