नवी मुंबई :- झाडांची कत्तल करणे अथवा स्थलांतर करणे याबाबत वृक्ष प्राधिकरण कक्षाचे नियम असून त्या नियमांचे पालन होतांना दिसून येत नाही.जर नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याला दंडात्मक अथवा कारावास अशी शिक्षा असतांनाही .ग्रीनस्कॅप आयटी पार्क एलएलपी कंपनीकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे.ज्या जागी आयटी पार्क होणार आहे त्या जागी विविध प्रकारचे झाडे असल्याने त्यांचे उत्तम रित्या स्थलांतर होणे गरजेचे होते.मात्र कंपनीकडून झाडांचे व्यवस्थित स्थलांतर झाल्याचे दिसून येत नाही.ज्या जागी झाडांचे स्थलांतर झाले आहे त्या जागीही झाडांची बिकट अवस्था झाल्याची दिसून येत आहे.त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी) कडून मे.ग्रीनस्कॅप आयटी पार्क एलएलपी कंपनीला नोटीस बजावली आहे.या नोटीस मे.ग्रीनस्कॅप आयटी पार्क एलएलपी कंपनीवर कारवाईची टांगती तलवार असून एम.आय.डी.सी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मे.ग्रीनस्कॅप आयटी पार्क एलएलपी कंपनीला एम आय डी सी ची नोटीस, कारवाईची टांगती तलवार