बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?


बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे 

सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात 

दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ?

सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?

नवी मुंबई :- नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत असलेल्या बालाजी मंदिर परिसराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर बांधकाम धारकांनी दगड फोडून त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांना सुरवात केली आहे.या दगड फोडीमुळे आजूबाजूला असलेलया इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसून भविष्यात टेकडीवरील बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक इमारतींना तडे जाण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या ठिकाणी सुरु असलेल्या इमारतीवर यापूर्वी सिडको व महापालिका अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली होती.त्या तोडक कारवाई नंतर मंदिर परिसराच्या मागील बाजूस असलेल्या सर्वच अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.मात्र कारवाई तर दूरच साधे त्या ठिकाणी लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने आजमितीस मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत.या बांधकामांमुळे जर भविष्यात सामान्य नागरिक अडचणीत आला अथवा जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image