कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतींचे कामे जोमात,तर तुर्भे विभाग अधिकारी कोमात ?, बेलापूर इमारत दुर्घटना सारखी दुर्घटना सानपाडा गावात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ?, तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?

कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतींचे कामे जोमात,तर तुर्भे विभाग अधिकारी कोमात ?,  

बेलापूर इमारत दुर्घटना सारखी दुर्घटना सानपाडा गावात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ?, 

 तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?

नवी मुंबई :- बेलापूर गावात चार मजली अनधिकृत इमारत कोसळुन तीन जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असूनही सिडको व मनपाचा अतिक्रमण विभाग तत्पर झाल्याचे दिसून येत नाही.आजमितीस तोडकं कारवाई झालेल्या इमारतींना डागडुजी करून आहे त्याच जागेवर भूमाफियांनी पुन्हा बांधकाम सुरु केल्याच्या घटना सानपाडा गावात दिसून येत आहे.भविष्यात जर या इमारती मोडकळीस आल्या तर अनेकांचे संसार उद्धवस्त होऊ शकतात.मात्र याचे कोणतेही सोयरसुतक मनपा व सिडको अधिकाऱ्यांना नसल्याने कारवाई झालेल्या इमारतींची कामे जोमात सुरु आहेत.सानपाडा गावात अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास येताच सिडकोने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.त्यावेळी सानपाडा गावातील हेमंत विष्णू मढवी यांचे सर्व्हे क्रमांक १ व ५४ या जागेवर इमारतीचे काम सुरु होते.त्यावर ३० /०४ /२०२४ रोजी सिडकोकडून करण्यात आलेल्या स्थळ पाहणी दरम्यान निदर्शनास आले कि अंदाजे ६०.०० चौ.मी (अंदाजे) मापाचे R.C.C (G + २) चे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे ०८ / ०५ / २०२४ रोजी हेमंत विष्णू मढवी यांना नोटीस बजावण्यात आली.सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मढवी यांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.त्यांनी वेळेत कागदपत्रे सादर न केल्याने अखेर त्या इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच जागेवर पुन्हा बांधकाम सुरु करण्यात आले आहे.सदरील बांधकाम धारकाने सिडको बरोबर सेटलमेंट केली असल्याची चर्चा गावात सुरु झाली असता पुन्हा त्याच इमारतीवर सिडको कडून कारवाई करण्यात आली.दोनदा कारवाई झाल्यानंतर पुन्हा काम सुरु होणार नाही असे चित्र दिसत असतांना पुन्हा त्याच जागेवर डागडुजी करून इमारतीचे काम जोमाने सुरु करण्यात आले.यावर तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांच्याशी संपर्के साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.त्यामुळे मनपा तर या अनधिकृत इमारतीला पाठिंबा देत नाही अशी चर्चा गावात सुरु झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे जाळे तयार होत असल्याने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने कारवाईचा धडाका लावला आहे.शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवत असतांना अनेकांना नोटीस बजावण्याचे कामही सिडको कडून करण्यात येत आहे.अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत इमारती अथवा पब किंवा बार यांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आजमितीस अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी शासन ,प्रशासन यंत्रणा खळबळून जागी होते आणि कारवाया सुरु होतात.जरी कारवाया सुरु असल्या तरी अधिकारी हातचा राखून कारवाया करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.नवी मुंबई शहरात बहुतांश अनधिकृत इमारती उभ्या राहत असून त्यावर विविध विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत.मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आर्थिक आशीर्वाद देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचे दिसून येते.


Popular posts
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image