तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?

तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ?

दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ?

दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?

नेरुळ व सानपाडा मधील अजून कारवाई अगोदरील व कारवाई नंतरची स्थितीची बातमी पुढील बातमीत. 


नवी मुंबई :- सिडको व मनपाच्या संयुक्त विद्यमाने दोनदा कारवाई झालेल्या सानपाडा गाव, सेक्टर ५,साई अपार्टमेंट जवळील इमारत कारवाई नंतर दोनच महिन्यात जलद गतीने उभी राह्ल्याने बांधकाम निकृष्ट असल्याची चर्चा गावात सुरु आहे.दोन महिने अगोदर या इमारतीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.त्या नंतर पुन्हा या इमारतीचे काम पुन्हा सुरु झाले.अनधिकृत इमारतीचे बांधकाम निकृष्ट असल्याने ते काही वर्षातच कोसळत असल्याच्या अनेक घटना नवी मुंबईत दिसून आल्या आहेत.काही दिवसांपूर्वी बेलापूर मध्येही चार मजली अनधिकृत इमारत कोसळुन तीन जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती. तरीही मनपा गाफील राहत असेल तर भविष्यात पिडीतांनी कोणाला न्याय मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.सानपाडा गाव, सेक्टर ५,साई अपार्टमेंट जवळील या इमारतीवर यापूर्वी दोनदा तोडकं कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यानंतर पुन्हा इमारत कशी उभारायची असा प्रश्न बांधकाम व्यावसायिकासमोर असतांनाच विभाग कार्यालयाने त्यात पुढाकार घेतल्याची चर्चा सुरु आहे.१५ लाख द्या,त्यानंतर तत्काळ काम करून अगोदर दुकाने सुरु करा,त्यानंतर दोन मजले बांधून त्यात ग्राहकांना राहायला द्या,नंतर पुढील काम करा.या अटीवर तडजोड झाल्याची चर्चा सुरु आहे.सदरील डील बांधकाम व्यावसायिकाने मंजूर केली असल्याने आज मितीस अत्यंत कमी कालावधीत बांधकाम पूर्णत्वास जात असल्याचे दिसून येत आहे.भविष्यात जर इमारत कमकुवत झाली,पडली,काही जण मृत्युमुखी अथवा जखमी झाले तर काळजी नको,तेव्हा बघता येईल,आता सध्या पैसे कमवुन घेऊ अश्या भूमिकेत अधिकारी असल्याचे दिसून येत आहे. 

Popular posts
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतींचे कामे जोमात,तर तुर्भे विभाग अधिकारी कोमात ?, बेलापूर इमारत दुर्घटना सारखी दुर्घटना सानपाडा गावात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ?, तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image