अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?

अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई

दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त 

झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश 

नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?

 नवी मुंबई :- नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून त्यावर कारवाई करण्याऐवजी बी" विभाग नेरूळ, अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली असून त्यांचे सामान जप्त करण्यात यश आले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत झोपड्यां विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने  नेरुळ विभागात  कारवाई करण्यात आली.

            उपरोक्त विषयानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत येणारे नेरूळ पुर्व येथील भगवान बाबा गार्डन, सेक्टर 9, नेरूळ ग्रीनलॅन्ड अपार्टमेंट जवळ नवी मुंबई महापालिका जल उदंचन केंद्रासमोर भर रस्त्यात पदपथावर अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या आहेत. त्या झोपडपट्टयांमधून अवैध व्यवसाय सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच त्या ठिकाणी रात्री 20 ते 25 लोक फुटपाथवरच झोपत असल्यामुळे सर्वसामान्य महिलांना वाट काढणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरीकांना सदर रहिवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रांमधुन जाहीर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 19/09/2024 रोजी "बी" विभाग नेरूळ, अतिक्रमण विभागामार्फत सदर ठिकाणावरील अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आली असून सामान जप्त करण्यात आले आहे. सदर मोहीमेअंर्तगत जप्त केलेल्या सामानामध्ये पाच बॅग, सहा पाण्याचे जार, कपडे भरलेले बोचके, दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल, सहा मोठे प्लायवूड, 3 लहान प्लायवूड, पाच बॅनर, छत्तीस बांबू, एक हिरवी जाळी, चार प्लास्टीक खुर्च्या, सहा पुठ्ठा बॉक्स इत्यादींचा समावेश आहे. जप्त्‍ा केलेले सामान दि. 19/09/2024 रोजी कोपरखैरणे क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आलेले आहे.सदर कारवाई अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, बारा मजूर, दोन पिकअप, एक डंपर, नेरुळ स्थानिक पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक, यांच्या मार्फत करण्यात आली आहे.यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Popular posts
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image