शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
नवी मुंबई :- नेरुळ मधील शिरवणे गावातील प्लॉट नंबर ३२१,सेक्टर १,कार्तिक अपार्टमेंट च्या बाजूला असलेल्या या इमारतीवर काही दिवसांपूर्वी तोडकं कारवाई झाली होती.त्या नंतर काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा मोठ्या जोमाने या इमारतीचे काम सुरु झाले.
गावठाण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु असल्याने सिडको व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संयुक्त रित्या तोडकं कारवाई करण्यात येतात.त्या नंतर सेंटलमेंट करून काही इमारती पुन्हा उभ्या राहत असल्याने त्याचा त्रास भविष्यात सामान्य नागरिकांना भोगावा लागतो. इमारतीवर कारवाई झाल्यानंतर इमारत कमकुवत होते व काही वर्षातच तो कोसळते.त्यावेळी त्या इमारतीत राहणारे कुटुंब रस्त्यावर येतात तर अनेक कुटुंब उध्वस्त होतात.त्यामुळे कारवाई झालेल्या इमारतींमध्ये घर अथवा दुकान घेणे हे धोकादायचं.नेरुळ मधील शिरवणे गावातील प्लॉट नंबर ३२१,सेक्टर १,कार्तिक अपार्टमेंट च्या बाजूला असलेल्या या इमारतीवर ४ सप्टेंबर रोजी सिडको कडून तोडकं कारवाई करण्यात आली होती.त्या नंतर महिना उलटत नाही तोच तीच इमारत पुन्हा उभी राहत आहे.कमी दिवसात जास्त काम झाल्याने कामाचा दर्जा कसा असेल याचा अंदाजा लावता येत नाही.त्यामुळे सिडको अथवा मनपा यावर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.