नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा

नवी मुंबई (योगेश महाजन) :- नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारती असून आजमितीस अनेक इमारतींचे अनधिकृत बांधकामे जोमाने सुरु आहेत.जुन्या चाळी तोडून त्या ठिकाणी ४ ते ५ मजली इमारतींचे कामे सुरु असून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांचा सपाटाच लावला आहे.सिडको व महानगरपालिका छोट्या भूमाफियावर कारवाई करून प्रशासन व शासनाची धूळफेक करत असल्याची बाब दिसून येत आहे.प्रति इमारत २५ ते ३० लाख रुपये  घेऊन बेलापूर विभाग कार्यालय व सिडको विभाग भूमाफियांनी अभय देत असल्याची चर्चा करावे गाव परिसरात आहे.नुकतेच उच्च न्यायालयाकडून अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण, त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग,बॅनर्स / पोस्टर वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर अमंलबजावणी होण्याऐवजी सेटलमेंट होत असल्याची बाब दिसून येत आहे.त्यावर मनपा आयुक्त कैलास शिंदे काय पाऊल उचलणार याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

                विनापरवानगी बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमन,१९६६ चे कलम अन्वये व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.तसेच विनापरवानगी होर्डिंग,बॅनर्स / पोस्टर आढळल्यास त्याविरुद्व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरूपण अधिनियमन,१९९५ मधील तरतुदीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येईल अश्या सूचना मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी केल्या आहेत.या सूचनांचे पालन करत अनेक ठिकाणी छोट्या अनधिकृत बांधकामांवर कारवाया करण्यात आल्या आणि त्याची प्रसिद्धी करण्यात आली.जेणेकरून कारवाया जोमाने सुरु आहेत याची प्रचिती वरिष्ठांना येईल यासाठी.२७ नोव्हेंबर रोजी करावे गावातील शांताराम महादू तांडेल, घर क्र. 839, करावे आणि सहदेव तुकाराम भोईर, करावे गाव तसेच संगिताबाई चंद्रकांत पाटील, घर क्र. 836, करावे यांच्यावर कारवाई करण्यात आली.मात्र मोठ्या इमारतींकडे ढुंकूनही बघण्यात आले नाही.करावे गावात बहुतांश प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.करावे गावातील मनपा शाळेच्या आजूबाजूलाच जी + ३ ते ५ मजली अनेक इमारतींचे कामे सुरु आहेत.त्यानंतर तलावाच्या समोर जी + २ ते ४ मजली अनेक इमारतींचे कामे सुरु आहेत.स्मशान भूमीच्या बाजूला तर भूमाफियांनी टाऊनशिप सारखे अनधिकृत बांधकाम सुरु केले असून त्यावर सिडको अथवा मनपा कोणाचीही नजर जातांना दिसत नाही.ट्रायसिटी इमारतीच्या समोर अनेक अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरु आहेत.पोद्दार शाळेच्या माघे तर अनधिकृत बांधकाम धारकांची स्पर्धाच लागली असून १५ ते २० जी + ४ ते ५ इमारतींची कामे सुरु असल्याची बाब निदर्शनास आली आहे.या सर्व प्रकरणांची माहिती दोन महिन्यांपूर्वी बेलापूर विभाग कार्यालय यांना देऊनही कारवाई झाल्याचे दिसून याले नाही.नेरुळ गावातील बालाजी मंदिराच्या माघील बाजूस भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु केली आहेत.सानपाडा गावातही ज्या अनधिकृत इमारतीवर सिडकोने कारवाई केली होती त्याच इमारती आता पुन्हा जोमाने उभ्या राहत आहेत. कोपरखैरणे मधील बोनकोडे गावातही दोन महिन्यांपूर्वी ज्या अनधिकृत इमारतीवर सिडकोने कारवाई केली होती तीच इमारत आता पुन्हा जोमाने उभी राहत आहे.तर मनपाच्या नागरी आरोग्य केंद्राच्या मोघेही मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे.अनधिकृत बांधकामे हा अधिकाऱ्यांसाठी एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून भाग बनला असल्याने पैसे दिले तर ठीक नाहीतर कारवाई अशे प्रकार सध्या दिसून येत आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमन,१९६६ मधील कलमानुसार अनधिकृत बांधकाम / अतिक्रमणांवर नोटीस देऊन निष्कासनाची कारवाई करणे,निष्कासनाचा खर्च वसूल करणे,फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच तद अनुषंगिक कारवाई करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र १५५/२०११,दि ०९/१०/२०२४ अन्वये रस्ते,पदपथ तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत होर्डिंग,बॅनर्स / पोस्टर विशेष मोहीम घेऊन हटविण्याचे आदेशित केले आहे.तर विनापरवानगी बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमन,१९६६ चे कलम अन्वये व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.अश्या सूचना मनपा आयुक्त यांनी केल्या असून त्यांच्या सूचनांना पायदळी तुडवण्याचे काम आठही विभाग कार्यालयाकडून करण्यात येत आहे.


Popular posts
विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई, बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image