सरकारी समन्वयाच्या अभावामुळे कोकणवासियांनीगमाविलेला आत्मविश्वास  पुन्हा मिळवून देऊ - विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर कोकण दौ-याला प्रारंभ, एमजीएम रुग्णालयाच्या व्यवस्थेचा घेतला आढावा


नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई आणि कोकणाचं विशेष नातं आहे. मात्र, मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांनी गावाकडे येऊ नये अशा पद्धतीचे चित्र काही दिवसांपासून सरकारच्या माध्यमातून विनाकारण उभं केलं जातं आहे. राज्य सरकारच्या यंत्रणांमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचा अभाव असल्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढत आहे.  कोरोना आणि लॉकडाऊनच्या स्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. नागरिकामधील आत्मविश्वास कमी होत चालला असून तो आत्मविश्वास मिळवून देण्याची आवश्यकता आहे.  या दौऱ्याच्या माध्यमातून कोकणवासीयांना आत्मविश्वास देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गाव आणि मुंबई यामधील दरी मिटवण्याचं प्रयत्नही या दौऱ्याच्या माध्यमातून करण्यात येतील. तसेच रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील व वेळप्रसंगी येथील नियोजनाच्या त्रुटी राज्य सरकारच्या निर्दशनास आणून देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज ठामपणे मांडली.


विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोनासंबंधी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  दिवसीय कोकण दौऱ्याला हा सर्व भाजपा आमदारांच्या उपस्थितीत प्रारंभ केला. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देण्यात आली. तेथील डॉक्टरांची विचापूस करण्यात आली व तेथील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पनवेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, महेश बालदी, नितेश राणे,विजय (भाई) गिरकर, प्रशांत ठाकूर,रमेश पाटील,प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत संवाद साधताना दरेकर म्हणाले, या दौऱ्याचा उद्देश्य कोरोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी होत नसलेल्या आवश्यक उपाययोजना सरकारला करायला भाग पाडणे, कोविड विलगीकरण केंद्र,रुग्णालय यांची पाहणी करून या ठिकाणी ज्या दुरावस्था आहे यांचा आढावा घेऊन तेथे आवश्यत व्यवस्था करणे हा दौऱ्याचा उद्देश्य आहे. या दौऱ्यादरम्यान फक्त आढावा आणि पाहणी करून थांबणार नसून जिथे जिथे काही आवश्यकता आहे तिथे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून जेथे आवश्यकता आहे तेथे पीपीई किट, मास्क, सँनिटायझर अशाप्रकारच्या गरजा आहेत त्या मदतीच्या भावनेतून पुरविण्यात येतील.यावेळी दरेकर यांनी सांगितले की, आज पनवेल येथील एमजीएम रुग्णालयाची पाहणी करून कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी  केल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेतला.या ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. या यंत्रणेसाठी पैसे उपलब्ध नाहीत असे असताना जिल्हाधिकारी,आयुक्त त्याचबरोबर  इतर माध्यमातून जवळपास दोन अडीच कोटी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा सदुपयोग होणे होण्याच्यादृष्टीने जमा झालेला निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वापरण्यास भाग पाडू असे दरेकर यांनी सांगितले.  रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जवळपास सहाशे रुग्णांची व्यवस्था होऊ शकते असे सांगण्यात आले. या भागात आतापर्यंत तीनशे रुग्ण असून तीनशे रुग्णांची व्यवस्था एमजीएम रुग्णालयात करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे लॅब आणि स्वॅप टेस्टिंग जवळपास दीडशे लोकांचे करू शकू अशा प्रकारचा विश्वास येथील संचालकांनी दिला आहे. यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या उपलब्ध करुन देण्यात येतील. एका टेस्टिंग ला साधारण  तीन हजार रुपये खर्च होतो हा खर्च सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. अशाप्रकारे छोटा-छोटा खर्च असताना यासाठी वाट पहावी लागत आहे. या सर्व बाबी सरकार समोर मांडून या संदर्भात मदत उपलब्ध करून देऊ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.मुंबई आणि कोकण यांचं वेगळं नातं आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल साधलेल्या संवादात मुंबईच्या चाकरमान्यांना गावी न जाण्याची सूचना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्ही आवश्यक यंत्रणा तसेच विलागीकरण सेंटर जिल्हा पातळीवर उभे करू शकलो नाही याची ग्वाही खुद्द त्यांनी दिली. हे अपयश महाविकास आघाडी सरकारचे असताना चाकरमान्यांनी गावी का जाऊ नये असा सवाल दरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. जिल्हा पातळीवर कोणतीही आवश्यक यंत्रणा उपलब्ध न करून केवळ सरकारचे अपयश लपविण्यासाठी  मुंबईकर ज्यांचे कोकणच्या विकासात महत्त्वाचे स्थान आहे त्याला गावी न जाण्याचे आवाहन करुन एक दरी निर्माण केली जात असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आरोग्यव्यवस्था आणि सरकार यांमध्ये समन्वयाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे.  जिल्हाधिकारी काय करत आहेत हे आयुक्तांना माहिती नाही. आयुक्त काय करत आहेत हे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना व रुग्णालय प्रशासनाला माहिती नाही. त्यामुळे हे टाळण्यासाठी या यंत्रणांमध्ये सुनियोजित समन्वयाची आवश्यकता आहे असेही दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले.जिल्हाधिकारी,आयुक्त,जिल्हा शल्य चिकित्सक,रुग्णालयाचे  प्रमुख या संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन कोरोना थांबविण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्याचे येथे आढळले नाही. त्यामुळे आवश्यक कृती आराखडा करण्याची आवश्यकता आहे. सरकारी पातळीवर जिल्हा आणि तालुका स्तरावर नियंत्रण व निरीक्षण व्हायला हवे. मात्र  त्याचाही अभाव असल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली.


Popular posts
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image