सीबीएसईच्या परीक्षेत नवी मुंबईतील विद्यार्थ्याची बाजी

सीबीएसईच्या परीक्षेत नवी मुंबईतील विद्यार्थ्याची बाजी


नवी मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावेळी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत देशभरातून 88.78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 15 फेब्रुवारी ते मार्च 30 दरम्यान सीबीएसईच्या परीक्षा देशभरात घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तब्बल 30 लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. सीबीएसई परीक्षा सुरु असतानाच, कोरोना व्हायरसच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. 2019 च्या तुलनेत यावर्षीचा निकाल 5.38 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 88.78 टक्के आहेत.


            या परीक्षेत नवी मुंबई येथील विद्यार्थी यांनीही बाजी मारली आहे. रायन इंटरनॅशन स्कूल सीबीएसई, सानपाडा आणि सेंट जोसेफ हायस्कूल सीबीएसई, पनवेल यांनी पुन्हा एकदा सीबीएसई बोर्डाच्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली असून  या शाळांत दिल्या जाणा-या शिक्षणाच्या उच्च दर्जावर शिक्कामोर्तब केले आहे. योगायोग म्हणजे या शाळांतील दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी आघाडी चे स्थान प्राप्त केले होते, तेच सर्व विद्यार्थी सीबीएसई १२ वी च्या परीक्षेत आघाडीच्या स्थानांवर आहेत.रायन इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई, सानपाडा येथील टॉपर उबैद नूरमोहम्मदद लवी या यशाबद्दल म्हणाला, कि  “मी माझ्या मुख्याध्यापिका मुरिएल रॉड्रिग्ज मॅम, माझे शिक्षक आणि माझ्या पालकांचे वर्षभर माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार मानतो. तसेच  पालकांनी मुलांना दिलेल्या पाठिंब्या बद्दल व आमच्यावर त्यांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे मत व्यक्त करीत रायनच्या व्यवस्थापकीय संचालक मॅडम ग्रेस पिंटो सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले. 


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image