कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यासाठी कोव्हीड रूग्णालयातील डॉक्टरांसाठी सुधारित कार्यप्रणाली आदेश

कोरोनाबाधितांचे मृत्यू रोखण्यासाठी कोव्हीड रूग्णालयातील डॉक्टरांसाठी सुधारित कार्यप्रणाली आदेश


नवी मुंबई - कोव्हीड 19 चा वाढता प्रसार रोखण्यासाठी नियोजनबध्द पावले टाकत महापालिका आयुक्त यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेतले असून त्याव्दारे रूग्णाचा लवकर शोध घेऊन व त्याचे त्वरित विलगीकरण करून कोरानाची साखळी खंडीत करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोनामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू होऊ नये हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असे इतर आजार असणा-या व्यक्तींकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.महापालिका आयुक्त अभिजीत बांगर कोणत्याही नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू होऊ नये याबाबत अत्यंत सतर्क असून दररोज संध्याकाळी सर्व आरोग्य अधिकारी, प्रत्येक विभागाचे नोडल ऑफिसर आणि विभाग अधिकारी यांच्याशी वेब संवाद साधून ते मृत रूग्णाच्या मृत्यूच्या कारणांविषयी सविस्तर माहिती घेऊन चर्चा करीत असतात. या चर्चेतून पुढील काळात इतर रूग्णांवरील उपचाराची पध्दती कशी असावी याला एक दिशा मिळते.
                  वाशी सेक्टर 10 येथील महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोव्हीड सार्वजनिक रूग्णालयातील गंभीर स्वरूपाच्या कोरोना बाधितांची मृत्यू संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत नसल्याने, महानगरपालिका क्षेत्रातील मृत्यू दर कमी करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन आयुक्तांनी विशेष आदेश निर्गमित केले आहेत.वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालयात गंभीर स्वरूपाची लक्षणे असणारे कोव्हीड 19 बाधित रूग्ण उपाचारासाठी येतात हे लक्षात घेऊन त्यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक व सुयोग्य उपचार व्हावेत ही आयुक्त अभिजीत बांगर यांची भूमिका आहे. त्याकरिता तेथे कार्यरत असलेल्या एकूण 11 फिजीशिेयन, इंटेन्सिव्हिस्ट / ॲनेस्थेटेसिस्ट अशा वैद्यकीय तज्ज्ञांच्या कामाच्या कालावधीचे नवीन वेळापत्रक आयुक्तांनी विशेष आदेशाव्दारे जारी केले आहे.यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला नेमून दिलेल्या वेळेत कोव्हीड 19 वॉर्ड आणि आयसीयू कक्षात उपस्थित असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी स्वत:हून प्रत्येक कोव्हीड 19 रूग्णाच्या आरोग्य स्थितीचे प्रत्येक तासाला देखरेख व निरीक्षण करावयाचे आहे. या कोव्हीड 19 रूग्णांवर नवीन आदर्श उपचार प्रणाली (Standard Treatment Protocol) नुसार योग्य उपचार करण्याची जबाबदारी या वैद्यकीय तज्ज्ञांवर निश्चित करण्यात आलेली आहे.रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांनी हे वैद्यकीय तज्ज्ञ, कोव्हीड 19 वॉर्ड आणि आयसीयू कक्षात त्यांच्या कार्य कालावधीत पूर्णवेळ उपस्थित असतील तसेच त्यांची उपस्थिती केवळ उपस्थिती म्हणून नाही तर तेथील गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना वैद्यकीय सुविधांचा अधिक गुणात्मक प्रभावी वापर करणारी असल्याची खात्री करून घ्यायची असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. याकरिता वैद्यकीय अधिक्षक यांनी दिवसातून किमान 3 वेळा कोव्हीड 19 वॉर्ड आणि आयसीयू कक्ष याठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावयाची आहे.इन्टेन्सिव्हिस्ट / ॲनेस्थेटिस्ट यांनी त्यांना सांगितलेल्या वेळी आयसीयू कक्षात उपस्थित रहावयाचे आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या कामाचे वेळापत्रक वैद्यकीय अधिक्षक यांनीही पाहून प्रमाणित करून घ्यावयाचे आहे.वैद्यकीय अधिक्षक तसेच औषध विभागाचे प्रमुख आणि संबंधित वैद्यकीय तज्ज्ञ यांनी आपल्या कामाच्या प्रगतीचा तपशील दररोज संध्याकाळी वेब संवादाव्दारे होणा-या बैठकीत सादर करावयाचा असल्याचे सदर आदेशात स्पष्ट केले आहे.कोरानावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोरोना बाधिताचा मृत्यू होऊ नये याकडे आयुक्त  अभिजीत बांगर विशेष लक्ष देत असून त्यादृष्टीने महानगरपालिकेच्या सेक्टर 10 वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालयातील उपचार पध्दतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी हे विशेष आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.


Popular posts
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image
बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतींचे कामे जोमात,तर तुर्भे विभाग अधिकारी कोमात ?, बेलापूर इमारत दुर्घटना सारखी दुर्घटना सानपाडा गावात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ?, तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?
Image