अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या राजेंद्र मरस्कोल्हे या शिक्षकाला अटक,शिक्षक आफ्रोट संघटनेचा अध्यक्ष 

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या राजेंद्र मरस्कोल्हे या शिक्षकाला अटक,शिक्षक आफ्रोट संघटनेचा अध्यक्ष 
नवी मुंबई - अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या राजेंद्र मरस्कोल्हे या शिक्षकाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.हा शिक्षक आफ्रोट संघटनेचा अध्यक्ष असून त्याला जिल्हा आदर्श पुरस्कारही प्राप्त होता.त्याच्यावर नागपूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
             नागपूर मधील काटोल रोड कन्या शाळेत ९ व १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राजेंद्र मरस्कोल्हे या शिक्षकाविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या.या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशीसाठी त्रिसदसिय चौकशी नेमली व त्या मार्फत चौकशी केली.त्या चौकशीत राजेंद्र मरस्कोल्हे दोषी आढळले असता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.तरीही राजेंद्र मरस्कोल्हे राजकीय दबाव वापरून काम करतच होता.त्यांच्या विरुद्ध खाते चौकशी सुरु असतानाच त्यांना सेवेत पुनः स्थापित करतांना शासनाच्या निर्देशाला केराची टोपली दाखवून जाणून बुजून दुर्लक्ष्य करून त्यांचा मूळ तालुका व ज्या तालुक्यात कार्यरत असताना निलंबित केले असेल तो तालुका वगळून अन्य तालुक्यामध्ये अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी असे शासनाचे निर्देश असताना शासनाची प्रतिमा मालिन करून नियमबाह्य मूळ नागपूर तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कुल ,अंबाझरी नागपूर येथे पदस्थापना केली.या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल न करता त्याला सक्तीने निवृत्त करण्याची नोटीस बजावण्यात आली.अल्पवयीन मुलीची छळवणूक प्रकरणी प्रशासनातील संबंधित अधिकारी राजेंद्र मरस्कोल्हे यांची पाठराखण करत असल्याची बाब समोर आली आहे.यासह अनेक तक्रारी समोर आल्या असत्या या तक्रारींची दखल घेत उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले.त्या चौकशीत सत्यात आढळली असता अखेर १६ सप्टेंबर रोजी नागपूर पोलीस ठाण्यात राजेंद्र मरस्कोल्हे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.व त्या नंतर त्यांना अटक करण्यात आली.


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image