‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई  : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम सर्वांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी असल्याने ही मोहीम केवळ शासकीय नसून लोकांची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
                मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सारी व आयएलआय रुग्ण अधिक काटेकोरपणे शोधावे तसेच सर्व्हेक्षण पथकांचे अहवाल दररोज विस्तार अधिकारी व इतर वरिष्ठ यंत्रणांनी तपासावे. ही मोहीम केवळ शासन राबवीत नसून लोकांची आहे. आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे यादृष्टीने जनजागृती करावी, मोहिमेत अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवून ती अधिक परिणामकारक करावी, असेही ठाकरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबांना भेटीचे उद्दिष्ट दिले आहे पैकी २४ लाख कुटुंबाना भेटी झाल्या असून १३ टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयच्या १५ हजार ३९२ रुग्ण तर कोविडचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेले २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या. सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले. ठाणे भागामधून २१ टक्के, नाशिक भागामधून १० टक्के, पुणे १८ टक्के, कोल्हापूर १५ टक्के, औरंगाबाद १२ टक्के, लातूर १३ टक्के, अकोला १३ टक्के आणि नागपूर भागामधून ६ टक्के इतक्या कुटुंबांचे सर्व्हेक्षण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सुचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यावेळी उपस्थित होते.


Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image