मोबाईल शोरूम फोडून चोरी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलीसांकडून अटक 

 



नवी मुंबई : परराज्यातील मागणीनुसार मोबाईल चोरी करून त्याचा पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.या गुन्हेगारांकडून तब्बल ४५ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यात अजून काही आरोपींची वाढ होऊ शकते या दृष्टिकोनातून तपास सुरु असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार  सिंग यांनी सांगितले.
                     शफिकउल्ला उर्फ सोनू अतिकउल्ला (२४), अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (२८) व इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी (२५) अशी त्यांची नावे आहेत. शफिकउल्ला हा टोळीचा म्होरक्या असून तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल व इतर साहित्य व एक कार असा ऐवज जप्त करण्यात आले आहे.या तिघांना मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे.चोरी करतांना कोणताही पुरावा राहू नये म्हणून हे तिघे अगोदर दुकानातील सीसीटीव्ही कनेक्शन ,त्याचा डीव्हीआर काढून घेत.त्यानंतर उच्च प्रतीच्या गॅस कटर च्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटत असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी दिली.खारघर येथे मोबाईल शॉप फोडल्याचा प्रकार ३० ऑगस्टला घडला होता.गॅस कटरने शटर कापून दुकानातील लाखोंचा माल चोरून नेण्यात आला होता.त्याठिकाणच्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआर देखील चोरण्यात आला होता. यामुळे गुन्हेगारांची माहिती कळू शकलेली नव्हती.त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंघाने एक पथक तयार करण्यात आले होते.या पथकाने गुन्ह्याचा छडा लावत अखेर तिघांना मुंबईच्या विविध भागातून अटक केली आहे.त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.या चोरटयांनी गुन्ह्याच्या दिवशी कुर्ला येथून एक कार पण चोरी केली होती.ती पण पोलिसांनी हस्तगत केली आहे.सदरील गुन्हेगार हे सराईत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.ते कोणाकडून मोबाईल घ्यायचे ,कोणाला द्यायचे ,अजून त्यांचे कोण कोण सहकारी आहेत याचा तपास सुरु असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी सांगितले.


 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image