तंबाखूच्या रागातून स्वाभिमान दुखावल्याने एकाची हत्या ,आरोपीला अटक

तंबाखूच्या रागातून स्वाभिमान दुखावल्याने एकाची हत्या ,आरोपीला अटक

नवी मुंबई  - तंबाखू मागितल्याचा राग मनात धरून एका इसमाची हत्या करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे.या आरोपीवर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने हत्येची पोलिसांना कबुली दिली आहे.तंबाखूच्या वादातून दोघांचाही स्वाभिमान दुखावला गेल्याने सदरील हत्याकांड झाले असल्याचे सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.
                    ओमप्रकाश शर्मा असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो भंगार वेचण्याचे काम करतो.हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला नेरुळ परिसरातून शिताफीने अटक केली.तर ननकु श्यामलाल राजभर उर्फ भारद्वाज असे मयत इसमाचे नाव असून तो नेरुळ सेक्टर २ येथे राहत होता.वाहन चालवण्याचे काम करणारा भारद्वाज भावाला भेटण्यासाठी जात असतांना सदरील प्रकार घडला. १९ नोव्हेंबर रोजी भारद्वाज सायंकाळी ४ च्या सुमारास पाम बीज मार्गावरून वाशीला चालत भावाला भेंटण्यासाठी जात असतांना तो काही वेळ पाम बीज मार्गावर थांबला होता.त्याच वेळी त्या ठिकाणी ओमप्रकाश आलाअसता त्याला भारद्वाजने तंबाखू मागितली.त्यावर मी दुकानदार आहे का असा प्रश्न ओमप्रकाश ने उपस्थित केला.याचा राग भारद्वाजला आला असता त्याने ओमप्रकाश ला मारहाण केली आणि वाशीच्या दिशेने चालत पळ काढला.त्याचवेळी ओमप्रकाशलाही राग अनावर झाला असता त्यानेही भारद्वाजचा पाठलाग केला आणि सानपाडा मोराज जवळील पाम बीज मार्गावर लोखंडी सळईने भारद्वाजवर हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला असता त्याने तिथून पळ काढला.याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्याला अगोदर उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी त्याची हत्या झाल्याचे समोर आले.या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनेची माहिती मिळवली आणि हत्या करणाऱ्या ओमप्रकाशलाही ताब्यात घेतले.त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Popular posts
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image