सिडकोच्या तिन्ही सहव्यवस्थापकीय संचालक व मुख्य दक्षता अधिकारी यांच्यावर मुख्य कामांच्या जबाबदाऱ्यां,कामाच्या विभागणीमुळे प्रत्येक बाबीवर विशेष लक्ष देणे शक्य

नवी मुंबई - सिडकोचे दैनंदिन प्रशासन हे अधिक सुरळीत व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने सिडकोचे व्यवस्थापकीयसंचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार सिडकोच्या तिन्ही सहव्यवस्थापकीय संचालक व मुख्यदक्षता अधिकारी यांच्यामध्ये कामांचे व जबाबदाऱ्यांचे विभाजन करण्यात आले आहे. याद्वारे प्रशासनात आणखीन सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे. सिडकोतर्फे सद्यस्थितीला अनेक महत्वाकांक्षी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या महत्वाकांक्षी प्रकल्पांसोबतच अन्य नागरी कामे व त्याच्याशी संबंधित प्रकल्प, विविध गृहनिर्माण योजना व सिडकोची अन्य महत्वपूर्ण कार्ये यांचे व्यापक स्वरूप पाहता या सर्व कामांची व प्रकल्पांची विभागणी सिडकोच्या तीन सहव्यवस्थापकीय संचालकांमध्ये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी घेतला आहे. यातून सिडकोच्या कामकाजात व एकूणच प्रशासनात आणखीन सुसुत्रता व वेग येण्यास मदत होणार आहे.

                    उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक-1, सिडको यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेसह गृहनिर्माण योजनांशी संबंधित सर्व बाबी, पणन- 1 व 2 विभाग, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना), नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील अनिधकृत बांधकाम विभाग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व या प्रकल्पासाठीचे भूसंपादन व पुनर्वसनासह इतर संबंधित सर्व बाबी, प्रणाली विभाग, नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व बाबी, कार्मिक विभाग व त्याचप्रमाणे इतर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. याचबरोबर एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक-2, सिडको यांच्याकडे व्यवस्थापक शहर सेवा 1, 2 व 3, नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे विभाग, नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र, गरजेपोटी, सहकारी संस्थांकरिता सहनिबंधक, मुख्य प्रशासक (नवीन शहरे) औरंगाबाद यांच्याकडून मुख्य कार्यालयाला पाठविण्यात येणारी सर्व प्रकरणे, अर्बन हाट, नवी मुंबईच्या सर्व नोडमधील वसाहत विभागाच्या विभागीय कार्यालयांमध्ये एकंदर समन्वय व देखरेख व त्याचप्रमाणे इतर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.तर कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक-3, सिडको यांच्याकडे मुख्य भूमी व भूमापन विभाग 12.5%- ठाणे व रायगड, नवी मुंबई प्रकल्पातील सर्व भूसंपादन, वित्त, सामाजिक सेवा विभाग, पुनर्वसन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, विधी विभाग, पाणी पुरवठा, पालघर नवीन शहर विकास यासोबतच इतर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. डॉ. शशिकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्याकडे नवी मुंबईतील नागरी सेवांमधील सुसुत्रतेवर देखरेख, नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगर पालिका यांच्याशी समन्वय साधणे, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग आणि तक्रार निवारण विभाग या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. “सिडको महामंडळाचा एकूणच सर्व कारभार अतिशय व्यापक असल्याने अशा प्रकारे सहव्यवस्थापकीय संचालकांमध्ये केलेल्या कामाच्या विभागणीमुळे प्रत्येक बाबीवर विशेष लक्ष देणे शक्य होणार आहे. यातून सिडकोचे प्रशासकीय कामकाज व त्याचबरोबर प्रकल्प व इतर विकासकामांत, नागरी सेवा-सुविधा पुरवण्यात आणखीन गतिमानता येणार आहे. यामुळे सिडको प्रशासन अधिक सुरळीत, आणि कार्यक्षमरीत्या चालण्यास मदत होऊन नागरिकांना सेवा अधिक जलद गतीने प्राप्त होतील”, असे मत डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी या संदर्भात व्यक्त केले

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image