भारतात ग्लॉकोमा रुग्णांचा आकडा सर्वाधिक, 12 दशलक्ष नोंद झालेल्या आणि 90% हून निदान न झालेल्या केससह जगाच्या तुलनेत भारतात ग्लॉकोमा रुग्णांची संख्या अधिक


नवी मुंबई - जागतिक ग्लॉकोमा सप्ताह 2021 चे आयोजन दिनांक 7 ते 13 मार्च 2021 दरम्यान करण्यात येते. जागतिक ग्लॉकोमा सप्ताह साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे लोकांना ऑप्टीक नर्व्ह तपासणीसह नियमितपणे डोळ्यांची तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन देऊन ग्लॉकोमामुळे येणाऱ्या अंधत्वाचे समूळ उच्चाटन करण्याचे आहे. 2021 ची संकल्पना “द वर्ल्ड इज ब्राईट, सेव्ह युअर साईट” आहे. लोकांनी नियमित डोळ्यांची तपासणी केल्यास सभोवतालचे सौंदर्य, चैतन्य आणि साहसाने रसरसलेले जग पाहता येईल’ ही भावना यातून अधोरेखित होते.     

                    भारत हा अगदी सहज ग्लॉकोमाची जागतिक राजधानी बनू शकतो. डोळ्यांचा विकार बळावून कायमचे अंधत्व येऊ शकते. या विकाराने 12 दशलक्ष लोकांना प्रभावित केले असून 90% हून अधिक केसचे निदान होऊ शकलेले नाही. आपल्या देशात वरिष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच वाढत्या मधुमेहाच्या तक्रारी सोबतच दृष्टीत वक्रपणा येणे या सारख्या धोक्याच्या घटकांमुळे आपल्या देशात संसर्गजन्य नसलेले ग्लॉकोमासारखे विकार वेगाने बळावू लागले आहेत. जगातील एकूण दृष्टीहिनांपैकी, 20% व्यक्ती आपल्या देशात आहेत असे डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहा मधुर कांकरिया यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ग्लॉकोमाला अटकाव करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत. ग्लॉकोमापासून उद्भवणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचा केवळ एकच मार्ग आहे. या विकाराची लक्षणे प्रारंभिक टप्प्यात दिसत नाहीत. या विकाराचे शक्य तितक्या लवकर निदान आणि त्यावर उपचार डोळ्यांवर आघात करणाऱ्या या छुप्या चोराला अटकाव करू शकतो.डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहा मधुर कांकरिया म्हणाल्या की, ग्लॉकोमाचे दोन मुख्य प्रकार आहेत: ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा. ओपन अँगल ग्लॉकोमा हा ग्लॉकोमाचा सर्वसामान्य प्रकार आहे. एकंदर 90% ग्लॉकोमा केसमध्ये हा प्रकार आढळून येतो. याचा वेग मंद असतो. डोळ्याच्या मध्यभागाला जोवर हानी होत नाही तोवर रुग्णाची दृष्टी शाबूत राहते. जर रुग्णाने डोळ्यांची तपासणी केली नाही तर कायमची हानी होऊ शकते. ग्लॉकोमाचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो – सुमारे 2.3% व्यक्तींना आयुष्यभर ग्लॉकोमाचा धोका असू शकतो असे नोंदीवरून स्पष्ट होते. तरीच, ज्या व्यक्तींचे वय 40 पेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबात ग्लॉकोमा आणि मधुमेहाचा इतिहास आहे, ज्या व्यक्तींना दृष्टी वक्री होण्याचा त्रास सतावतो त्याचप्रमाणे स्टेरॉईड औषधे, डोळ्यांचे ड्रॉप, गोळ्या, इनहेलर आणि त्वचा मलमांचा वापर करणाऱ्यांना मोठा धोका असतो. या गटात मोडणाऱ्या व्यक्तींनी दरवर्षी ग्लॉकोमाची तपासणी केली पाहिजे.डॉ. स्नेहा मधुर कांकारिया पुढे माहिती देतात की, दृष्टिहीनत्व येऊ नये यासाठी ग्लॉकोमावर प्रभावी उपचार केला पाहिजे. याचे निदान दोन वर्गवारीत विभागलेले आहे: वैद्यकीय तपासणी आणि निदान चाचणी. वैद्यकीय तपासणीत डोळ्यांची तपासणी खास साधने जसे की, स्लीट लँप बायोमायक्रोस्कोपी, टोनोमीटर आणि गोनीओस्कोपीने करण्यात येते. निदान चाचणीत पेरीमेट्री, पॅचीमेट्री, ऑप्टीक नर्व्ह हेड फोटोग्राफी, ऑप्टीकल कोहेरेन्स टोमोग्राफी, स्कॅनिंग लेसर पोलारीमेट्री आणि कॉन्फोकल लेसर स्कॅनिंग ऑप्थाल्मोस्कोपचा समावेश आहे. 

Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image