तळीरामांना आश्रय देऊन नेरुळ पोलिसांची पाणीपुरीवाल्यावर दबंग कारवाई

नवी मुंबई - कोरोनाचा कहर रोखण्यासाठी सर्वत्र कडक निर्बंध लादण्यात आले असतांनाही त्या निर्बंधांचे तळीरामांकडून सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे.याकडे पोलिसांचाही कानाडोळा होत असल्याने या प्रकारात वाढ होत आहे.मात्र इतर व्यावसायीकांना त्यात सवलत नसल्याने त्याचा भुर्दंड मात्र त्यांना पडत आहे.अशीच एक नेरुळ पोलिसांची दबंग कारवाई समोर आली आहे.पोलिसांनी नियमबाह्य काम करणाऱ्या एका पाणीपुरी वाल्यावर कारवाई केली असून त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केला आहे.

                     दिनेश मोतीबर राम (२८) असे कारवाई करण्यात आलेल्या पाणीपुरी वाल्याचे नाव असून तो जुईनगर सेक्टर २३ मध्ये राहणार आहे.दिनेशचा जुईनगर सेक्टर २३ साईबाबा मंदिराजवळ पाणीपुरीचा व्यवसाय आहे.लॉकडाऊन काळात त्याने सायंकाळी सातच्या सुमारास पाणीपुरीची हातगाडी लावली असता चार ते पाच ग्राहक त्या ठिकाणी आले.त्याच वेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नजर दिनेशच्या गादीवर पडली व तो नियमबाह्य पद्धतीनं काम करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्यावर तत्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.यामुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली असून तीच दहशत खुलेआम दारू पिणाऱ्या तळीरामांवरही पसरणे गरजेचे आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चैन आदेशानुसार संचारबंदी अंतर्गत मार्गदर्शन सूचना व निर्बंध जाहीर करण्यात आले असून ते निर्बंध सर्रास तळीरामांकडून पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून येत आहे.दारू विक्रेत्यांना घरोपच दारू विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून तसे होतांना दिसून येत नाही.नेरुळ रेल्वे स्थानक राजहंस वाईन शॉप समोर तर रोज शेकडो जण दारू पितांना दिसून येतात.याची माहिती देऊनही नेरुळ पोलीस कारवाई करत नाहीत.त्यामुळे बळीचा बकरा फक्त सामान्य व्यवसायिकांनीच व्हायचं का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Popular posts
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
Image