१०० रोबोटिक कार्डियाक सर्जरीज पूर्ण करणारे 'अपोलो' एकमेव रुग्णालय ,अपोलोने ७० मिनिटात रोबोटिक कॉम्प्लेक्स मिट्रल व्हॉल्व्ह रिपेअर करण्याचा नवा टप्पा पार केला

नवी मुंबई :- अपोलोने विशेष रोबोट-असिस्टेड कार्डियाक सर्जरी युनिटमध्ये १०० रोबोटिक्स कार्डियाक सर्जरीज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची घोषणा रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. देशात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी शस्त्रक्रिया क्षेत्राच्या आजवरच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. रुग्णालयाने अशीही घोषणा केली आहे की त्यांच्या टीमने दा-विंची रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने, शरीरावर चिरा आणि छेद दिले जाण्याचे प्रमाण खूपच कमी असलेली, रोबोटिक-असिस्टेड कार्डियाक सर्जरी पद्धत वापरून एक गुंतागुंतीची मिट्रल व्हॉल्व्ह सर्जरी अवघ्या ७० मिनिटांपेक्षा कमी अवधीत पूर्ण करून इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रात नवा मापदंड रचला आहे.

                सिनियर कन्सल्टन्ट, कार्डिऑथोरॅसिक आणि वस्क्युलर सर्जन व रोबोटिक कार्डियाक सर्जरी युनिटचे एचओडी डॉ. सात्यकी नाम्बला यांनी सांगितले, "हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार व्यक्तीला त्याच्या/तिच्या आयुष्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या वर्षांमध्ये त्रास देऊ लागतात आणि त्यामुळे अनेक आपत्तीजनक सामाजिक व आर्थिक परिणाम होतात. रोबोट-असिस्टेड कार्डियाक सर्जरी प्रोग्राम स्थापित करण्यासाठी प्रचंड प्रमाणात निष्ठा आणि तयारीची आवश्यकता असते. आमच्याकडे २०१९ च्या शेवटी या प्रोग्रामची सुरुवात झाल्यापासून १०० रोबोटिक कार्डियाक सर्जरीज पूर्ण करणारे भारतातील पहिले रुग्णालय बनण्याचा मान आम्हाला मिळतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये छाती पूर्ण खोलावी लागते पण त्याच्या तुलनेत दा-विंची नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या कार्डिओव्हस्क्युलर शस्त्रक्रिया देखील शरीरावर खूपच कमी चिरा देऊन आणि अगदी नेमक्या ठिकाणी हालचाल नियंत्रणासह आम्हाला करता येणे शक्य झाले आहे.इंट्यूटिव्ह इंडियाचे व्हीपी व जनरल मॅनेजर मनदीप सिंग कुमार यांनी सांगितले, "१०० यशस्वी रोबोटिक-असिस्टेड कार्डियाक सर्जरीज् सारख्या आदर्शवत यशाचा एक भाग होण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. इंट्यूटिव्हमध्ये आम्ही असे मानतो की, तंत्रज्ञानाने सर्जनची किचकट प्रक्रिया सहजपणे पार पाडण्याची क्षमता वाढवली पाहिजे आणि क्लिनिकल परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यातही मदत केली पाहिजे. अचूकपणातील वाढ, व्हिज्युअलायझेशन, लवचिकता यातील सुधारणा, क्लिनिकल परिणामांमध्ये सुधारणा करण्याची क्षमता या लाभांमुळे आजच्या काळात जास्तीत जास्त सर्जन्स रोबोटिक-असिस्टेड सर्जरीकडे आणि दा विंची सिस्टिमकडे वळत आहेत.यासोबत अत्यंत कमी इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी क्षेत्रातील डॉ. सात्यकी यांचे नैपुण्य या सगळ्यातून या रुग्णालयाने आणि त्यांच्या प्रमुख टीम्सने स्थापन केलेल्या जागतिक दर्जाच्या मानकांची खऱ्या अर्थाने साक्ष पटते. जास्तीत जास्त रुग्णांना रोबोटिक असिस्टेड सर्जरी उपलब्ध करवून देण्यासाठी अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्ससोबत केलेली भागीदारी आमच्यासाठी अभिमानास्पद आहे."भारतात कर्करोगापेक्षा जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. हृदय विकार आणि त्यांना कारणीभूत ठरणाऱ्या जोखमीच्या बाबी यांच्या प्रमाणात होत असलेली वाढ हे यामागचे कारण आहे.  संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतात २०१६ साली जवळपास ५४.५ मिलियन हृदयरोगी होते आणि दर चारपैकी एक मृत्यू हृदय विकारांमुळे होत असे, यापैकी ८०% पेक्षा जास्त नुकसान इस्केमिक हृदयरोग आणि स्ट्रोक यामुळे होते.