अपोलो मार्फत 'मेडिसिन फ्रॉम दि स्काय', 'ड्रोन' च्या माध्यमातून तातडीची वैद्यकीय सेवा व औषधे पुरविणारे अपोलो पहिले रुग्णालय

नवी मुंबई :- भारतात आज सुरु होत असलेला, कोविड-१९ लसींसाठी नवा ड्रोन डिलिव्हरी पायलट प्रोग्राम म्हणजे वैद्यकीय कामांसाठी ड्रोन्सचा उपयोग करण्याच्या अपोलो हॉस्पिटल्सच्या अग्रगण्य प्रयत्नांचे यश आहे. आज सुरु करण्यात आलेल्या नव्या ड्रोन डिलिव्हरी पायलट प्रोग्राम हा कोविड-१९ लसी ड्रोनमार्फत पोहोचवण्यासाठी आशिया खंडात सुरु करण्यात आलेला पहिला उपक्रम असून त्याचे आयोजन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने, अपोलो हॉस्पिटल्सचे हेल्थनेट ग्लोबल आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या सहयोगाने केले आहे.

                  ट्रॅफिक, अडचणींचा भूप्रदेश आणि लांबवरचे अंतर अशा समस्यांचा अडसर न येता ड्रोन्स अगदी वेळेत आरोग्यसेवा पोचत्या करू शकतात. ऑडिओ-व्हिडिओ ब्रॉडकास्ट, जीपीएस नेव्हिगेशन, संपूर्णतः स्वयंचलित आणि आधी ठरवण्यात आलेल्या, एआयच्या आधारे होणाऱ्या फ्लाईट्स यासारख्या आधुनिक क्षमतांसह ईएमएस ड्रोन्स आपत्ती काळात आरोग्यसेवा पोचत्या करण्याच्या बाबतीत मोठी क्रांती घडवून आणतील. ड्रोनमार्फत ऑडियो-व्हिडिओ संपर्क क्षमता रुग्णालयातील डॉक्टरांना अपघाताच्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचलेल्या व्यक्तींना जीवनरक्षक सीपीआरसाठी सूचना देण्यात आणि त्यावर लक्ष ठेवण्यात सक्षम करतात, त्यामुळे डॉक्टर अपघातस्थळी पोहोचेपर्यंत सर्वसामान्य व्यक्ती देखील सीपीआर किंवा प्रथमोपचार देऊन जखमी व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात. हृदयाचा झटका किंवा तत्सम इतर आणीबाणी उद्भवल्यास ड्रोनचा वापर करून रक्ताचे नमुने प्रयोगशाळेपर्यंत पोहोचवता येतात, यामुळे वेळेची बचत होते आणि आजाराचे लवकरात लवकर निदान केले जाऊ शकते. हृदयाचा झटका आलेल्या व्यक्तीला ऑनसाईट इमर्जन्सी युनिटमध्ये औषधे देखील ड्रोनमार्फत पोहोचवली जाऊ शकतात.अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, "सप्टेंबर २०१८ मध्ये अपोलो हॉस्पिटल्सच्या ३५व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अपघातस्थळी किंवा आपत्तीमध्ये जीवनरक्षक ईएमएस प्रतिसाद ड्रोन्सच्या वापराचे यशस्वीपणे सादरीकरण करण्यात आले होते. अपोलो ईएमएस ड्रोनच्या सादरीकरणात अपघात प्रसंगात किंवा आपत्ती उद्भवल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवा पोहोचवण्यात युएव्ही (अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स) किती क्षमतेने काम करू शकते ते दाखवण्यात आले. सादरीकरण एक भविष्यज्ञानी घटना म्हणून सिद्ध झाले असून त्यावरील सातत्यपूर्ण संशोधनामुळे तेलंगणामध्ये एमएमआर, इन्फ्ल्यूएंझा आणि कोविड-१९ लसी पोहोचवण्यासाठीच्या ट्रायल्सच्या तयारीत खूप मोठे योगदान दिले आहे. प्रत्यक्ष रुग्णापर्यंत किंवा गरजूंपर्यंत आरोग्यसेवा पुरवण्यात ड्रोन्स आणि त्यासोबत टेलिमेडिसिन यामुळे जेव्हा हवे तेव्हा आणि हवे तिथे आरोग्यसेवा पोहोचवणे शक्य होईल. "आणीबाणीचे प्रसंग आणि आपत्ती काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश असलेल्या आधुनिक क्षमतांसह युएव्ही ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात अपोलो हॉस्पिटल्स आघाडीवर आहे.  आपत्ती काळात मदत पोहोचवण्यासाठी आणि अपोलो हॉस्पिटल्समध्ये तातडीची वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी नावीन्य आणि कल्पनाशक्ती यांचा मिलाप करून २०१८ साली इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस ड्रोन प्रदर्शन यशस्वीपणे करण्यात आले. एका व्हिडिओ फीडच्या माध्यमातून अपघाताचे तपशील रिले करत होता आणि अपोलो हॉस्पिटल्समधील वर्तमान आपत्ती प्रतिसाद नियमांसह ते अखंडपणे एकीकृत करत होता.

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image