येवला - टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप निळखेडे यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळखेडे येथे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम पार पडला.सुमारे ६४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे ह्या कार्यक्रमाचे आयोजन टायगर ग्रुपचे संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भाऊ कदम यांनी केले.
पै तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पंधरा दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामंधे गरजू महिलांना साड्या वाटप रुग्णांना फळ वाटप दिवाळी फराळ वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन डॉ पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. यावेळी गणेश कदम, विशाल कदम, सुरज खोखले, स्वप्निल पगारे, सदाशिव पिंपळे, किरण कदम, प्रसाद इघे विशाल इंगळे, हनुमान इघे, भाऊसाहेब हिवाळे आदी उपस्थित होते.