सुरक्षा रक्षकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यावर मंडळाची कारवाई, राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा दणका

नवी मुंबई :- वेटिंग मारणे, ड्युटी देणे, नवीन भरती यासह सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,सानपाडा कार्यालयातील इतर कामांसाठी पैसे घेणाऱ्या दलालांविरोधात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेनें आक्रमक भूमिका घेतली असून त्याचा पहिलाच दणका अमर बी त्रिपाठी या भामट्याला बसला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत या विषयावर राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने यावर आक्रमक भूमिका घेतली असता त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्त अशोक डोके यांनी दिले आहेत.यापुढे कामासाठी कोणीही पैशाचे व्यवहार करू नका,तरी कोणी मागत असेल तर त्याची कल्पना अगोदर संघटनेला द्या असे आव्हान यावेळी समस्त सुरक्ष रक्षक बांधवाना राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी केले आहे.

                सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,सानपाडा कार्यालयातील हजारोंच्या संख्यने असलेले वेटिंग कमी करण्यासाठी तसेच त्यांना काम मिळावे यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने पुढाकार घेतला असून त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून धडक आंदोलन सुरु केले आहे.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १५ दिवसांचा अल्टिमेटम देत नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांची यादीही मंडळाला सुपूर्द करण्यात आली होती.त्यावर पाठपुरावा म्हणून १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा मंडळावर धडक देण्यात आली असता त्यावेळी मंडळाकडून २९ नोव्हेंबर पर्यंतचा वेळ मागून घेण्यात आला.त्याचेवेळी सुरक्षा रक्षकांची फसवणूक करणाऱ्या अमर बी त्रिपाठी या भामट्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा मंडळावर राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके (मामा),कार्यध्यक्ष प्रकाश कोळी,सहसचिव सचिन लोखंडे,सुनील वरेकर,राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप माने,सहसचिव भाऊराव आसवले,मुंबई अध्यक्ष सचिन शिंदे, सल्लागार दिलीप शेलार,नवी मुंबई महिला अध्यक्ष मनीषा रोहम यासह शेकडो वेटिंग वरील सुरक्षा रक्षकांसह धडक देण्यात आली.यावेळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने सादर केलेल्या मागण्यांसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी त्यावर खुलासा केला.त्याचवेळी सुरक्षा रक्षकांची फसवणूक करणाऱ्या अमर बी त्रिपाठी या भामट्यावर कारवाई संदर्भात विचारणा केली असता त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्त अशोक डोके यांनी दिले.
Popular posts
लाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार
Image
रुग्णांना मिळणार 'इंटरनॅशनल सेकंड ओपिनियन' सेवा, ‘द-क्लिनिक बाय क्लीव्लॅंड क्लिनिक’ सोबत अपोलोने केला सहयोग करार
Image
नवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार
Image
बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,अनेक तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने आयोजन
Image
महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य
Image