क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन,महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन

नवी मुंबई :- महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त परंपरेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या नोंदणीकृत महिला संस्था / महिला मंडळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या निमित्ताने महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून आठही विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग नवी मुंबई याठिकाणी स्पर्धा प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक २८ डिसेंबर हा आहे.

       या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा (विभाग कार्यालयस्तरीय) आयोजित करण्यात आली असून स्वच्छ महाराष्ट्र अभियान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा आधुनिक सावित्री व तिचा आदर्श ! या ३ पैकी एका विषयावर रांगोळी काढावयाची आहे.मेहंदी स्पर्धा (विभाग कार्यालयस्तरीय) करिता भारतीय संस्कृती हा विषय देण्यात आलेला आहे. निबंध स्पर्धा "जन्माला ये सावित्री पुन्हा" या विषयावर घेण्यात येत आहे व पाककला स्पर्धेमध्ये सहभागाकरिता घरगुती सहज सोप्या पौष्टिक पाककला सादर करावयाची आहेत.याशिवाय सॅलेड सजावट स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा या स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा सहभागाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर आहे.रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे आयोजन विभागनिहाय २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेमध्ये होईल.नृत्य व गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी ३० डिसेंबर रोजी, विष्णुदास भावे नाट्यगृह, तालीम हॉल, पहिला मजला, वाशी येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे.महिला मंडळे / महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर अशी असणार आहे.या स्पर्धांमध्ये केवळ नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिलाच सहभाग घेऊ शकतात. दाखल झालेल्या अर्जापैकी एक अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार  महापालिका आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी / कर्मचारी यांनी राखून ठेवलेला आहे.

             सर्व स्पर्धांची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती याकरिता संबंधित विभागाच्या समन्वयक कर्मचा-यांशी संपर्क साधावयाचा आहे.

बेलापूर विभाग – मोहन गायकवाड – 8652441101, अनुपमा आरकडे – 8655590465

नेरुळ विभाग  - प्रियंका पाटील – 9082311440, किरण विश्वासराव – 9819204145  

वाशी विभाग  - संतोष सुपे – 8380987456, निलीमा धोंगडे – 9326540277

तुर्भे विभाग - स्वप्नाली म्हात्रे – 9082544474, जिज्ञेश देवरुखकर - 9004182412

कोपरखैरणे विभाग - स्मिता व्यवहारे – 8689868333, गजानन चव्हाण – 8888849220

घणसोली विभाग   -  संतोष मोरे – 9004098716, संतोष गावित - 7977170237

ऐरोली विभाग     - प्रतिक्षा हुंडारे – 8898329622, मनोहर राऊत - 9224641224

दिघा विभाग      -  विजय चव्हाण – 8291452781, हेमंत परते – 9545362568 

स्पर्धेचे अर्ज महानगरपालिकेची सर्व आठ विभाग कार्यालये तसेच उपआयुक्त, समाजविकास विभाग, बेलापूर भवन येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच स्विकारले जातील. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी आयोजित या विविध स्पर्धा उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कऱण्यात येत आहे. 

Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image