नकली दस्तावेज तयार करून देवस्थानच्या इनामी जमिनींची विक्री करण्यासाठी मदत करणारे सरकारी बाबू गजाआड , अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठी या 6 अधिकाऱ्यांसह 32 जणांवर अखेर गुन्हा दाखल

नाशिक (रेणुका गायकवाड - महाले) :- संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मंदिर, देवस्थान व मज्जिदच्या इनामी जमिनींची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणारे भूमाफिया व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळ्या कार्यान्वित असल्याचे आजपर्यंत ऐकण्यात होते पण आता तर एक मोठे प्रकरण अहमदनगर येथे नुकतेच उजेडात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.2006 मधे अहमदनगर येथील देवस्थानची इनामी  जमिनीचे बोगस दस्तावेज तयार  करण्यात आले आणि ही बोगसगिरी करण्यासाठी 6 अधिकाऱ्यांसह 32 लाच  घेतल्याचे निदर्शनात आल्यावर संबंधितांवर अहमदनगरचे ACB विभागाचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

                   प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की 3-1-2006 रोजीचे पूर्वी ते 6-1-2006 रोजी मौजे वडगाव गुप्ता शिवारातील गट न 203 क्षेत्र नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर ३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब ची जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. यातील १) लोकसेवक तहसिलदार एल. एन. पाटिल यांनी काढलेल्या आदेशास २) लोकसेवक एल. एस. रोहकले, तत्कालीन तलाठी सजा गांवगुप्ता ३) लोकसेवक दुर्गे, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव यांनी मदत केली आहे व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार- नोंदी घेवुन खाजगी इसम उत्कर्ष पाटिल व अजित लुकड यांना मदत केली आहे. तसेच लोकसेवक ४)लोकसेवक तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे व ५) तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे याना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असुन देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होवुन सदर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे दिसुन येत आहे. ६) लोकसेवक दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर- २ यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे. तसेच नमुद जमिनीचे भोगवटादार ७) दिनकर आनंदा शिंदे, ८) विनायक शंकर शिंदे, ९) बाबु आनंदराव शिंदे, १०) मोहन आनंदराव शिंदे, ११) वामन किसन शिंदे, १२) यादव किसन शिंदे, १३) सदाशिव केशव शिंदे, १४) रामभाऊ केशव शिंदे, १५) सुनिल केशव शिंदे, १६) यादव केशव शिंदे, १७) श्रीमती मालनबाई केशव शिंदे, १८) श्रीमती लता शांतवण भाकरे, १८)अरुण दगडु शिंदे, २०) शालनबाई दगडु शिंदे, २१) लक्ष्मण रामचंद्र शिंदे, २२) मथुरा विष्णु शिंदे, २३) संदिप विष्णु शिंदे २४) सुनिता रतन गायकवाड, २५) नंदा शाम घाटविसावे, २६) शालुबाई शाहुराव प्रभुणे,२७) मच्छिंद्र आनंदाव शिंदे, २८) लिलाबाई चंद्रभान पाडळे, २९ ) शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार ३० ) वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, ३१) सुशिला शांतवण घाटविसावे ३२) तुळसाबाई मारुती नरवडे, ३३)छबुबाई भिवाजी साळवे, ३४) इंद्रायणी विठठल जाधव, ३५) वत्सला वामन जाधव, ३६) कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार ३७) उत्कर्ष सुरेश पाटील, रा. श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर व जमिन खरेदी करणारे ३८ ) अजित कचरदास लुंकड, रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर यांना सदरची जमिन हि महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ब ची जमिन असल्याचे माहित असुन देखील त्यांनी वरिल नमुद तहसिलदार यांना सदर जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करुन, खोटे कागदपत्र तयार करून, सदर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करुन ७/१२ उताऱ्यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करून शासनाची फसवणुक केली आहे. सदर बाबत एम.आय.डी.सी. पो.स्टे., जि.अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि. क.१६७ ४२० १०९ प्रमाणे दि.१९/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक श्री प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत. महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये स्थानिक भूमाफिया व भ्रष्ट अधिकारी व राजकारणी यांच्यामार्फत शासनाची फसवणूक करून अनेकदा देवस्थान, वफ्फ बोर्ड , व मंदिरे यांच्या इनामी जमिनी चे खोटे कागदपत्रे तयार करून खरेदी-विक्रीचे प्रकार सतत घडत असतात परंतु अशा बोगस खरेदी विक्री प्रकरणांमध्ये पहिल्यांदाच अधिकारी व कर्मचारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे अनेकांना पळता भुई थोडी झाली आहे, या कारवाईनंतर तरी देवाच्या जमिनी वाचतील अशी आशा सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर कारवाई ही शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक माधव रेडडी, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगरकडील पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, पोहेकॉ संतोष शिंदे, पोकॉ रविंद्र निमसे, पोना विजय गंगुल यांचे पथकाने केली आहे.

Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image