पात्र नसतांनाही मनपाकडून कंत्राटदाराला करोडो रुपयांचे देखभाल दुरुस्तीचे काम, मर्जीतल्या कंत्राटदाराला काम मिळावे म्हणून अधिकाऱ्यांकडून नियम पायदळी , मनपा आयुक्त राजेश नार्वेकरांच्या कारकिर्दीत घोटाळ्यांची मालिका

नवी मुंबई :- स्वछ सर्वेक्षण २०२३ हे मनपा अधिकाऱ्यांना करोडो रुपये कमवून देणारी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरली असून अधिकारी अजूनही त्याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.सर्व काही उघड्या डोळ्यांना दिसत असूनही मनपा आयुक्त राजेश नार्वेकर हे झोपेचे सोंग घेत असल्याने अखेर घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.रंगरंगोटीच्या कामानंतर आता पुन्हा ठाणे बेलापूर रोडवरील देखभाल दुरुस्तीच्या कामाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.११ करोड रुपयांहून अधिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवल्याने प्रशासनात कायदा सुवव्यस्था आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

              स्वछ सर्वेक्षण २०२३ मध्ये झालेल्या रंगरंगोटीच्या कामातील करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणे अजून प्रलंबित असतांनाच त्याच विभागातील अजून एक भोंगळ कारभार समोर आला आहे.ठाणे-बेलापूर रस्त्यावरील महापे जंक्शन ते विटावा जंक्शन पर्यंत रस्त्याची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे (86637) च्या कामाचे 6,88,51,557/- रुपये रकमेचा टेंडर काढण्यात आला आहे तर त्यांचवेळी ठाणे-बेलापूर रस्त्यावरील महापे लोकमत भवन जंक्शन ते एस.के.व्हील मारुती सर्व्हिस स्टेशन तुर्भे पर्यंत रस्त्याची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे (86689) च्या कामाचे 5,27,70,431/- रकमेच्या कामाचाही टेंडर काढण्यात आला आहे.या कामासाठी निविदा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या असत्या त्यासाठी अनेक कंत्राट दारांनी ऑनलाईन निविदा भरल्या.त्या ऑनलाईन निविदेत बहुतांश कागदपत्रे प्रशासनाची फसवणूक करणारे असल्याचे निदर्शनास येताच निविदेतील कागदपत्रे पुन्हा तपासून त्याची शहानिशा करण्यात यावी.तोपर्यँत वरील दोन्ही कंत्राटाची वर्क आर्डर देण्यात येऊ नये.तर संपूर्ण टेंडर प्रक्रिया स्थगित करावी.अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मनपाकडे करण्यात आली.तरीही कोणतीही शहानिशा न करता कंत्राटदाराने काम सुरु केल्याची चर्चा प्रशासनात सुरु आहे.वरील करोडो रुपयांचे दोन्ही टेंडर हे आपल्याच मर्जीतील कंत्राट दाराला मिळावे म्हणून मनपातील एका मोठ्या अधिकाऱ्याने साम, दाम, दंड वापरल्याचे सांगण्यात येत आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांची कामे काढायची आणि त्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा.अशी स्थिती सद्य मनपात असल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांच्या विकास कामावर पडत आहे.यापूर्वीही स्वछ सर्वेक्षणाच्या नावाखाली करोडो रुपयांची डाळ शिजवणाऱ्या नवी मुंबई मनपा टी.बी.आर विभागातील २० करोड रुपयांहून अधिक रकमेच्या झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे व उप अभियंता निलेश मोरे यांना तत्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे समाजसेवक योगेश महाजन यांच्याकडून करण्यात आली होती.त्यावेळी चौकशी अथवा निलंबन न करता आयुक्तांनी उप अभियंता निलेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांची उचलबांगडी केल्याने झालेल्या घोटाळ्याचे व निलंबनाचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.त्यावर अजूनही निर्णय झाला नसतांना आता नवीन भोंगळ कारभारावर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.देखभाल दुरुस्ती अगोदर टी.बी.आर विभागाच्या माध्यमातून महापे अंडरपास रस्त्याचे बिनाटेण्डर काम यासह तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली अश्या पाच रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेली रंगरंगोटीची कामे आहेत.ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी भिंतीस रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यासाठी ३०,६५,४५२/- रुपयांचे टेंडर, तुर्भे रेल्वे स्टेशन परिसरातील कामाचे  २९,१४,९७२ /- रुपयांचे टेंडर, घणसोली रेल्वे स्टेशन परिसरातील २५,९७,९७६ /- रुपयांचे कामाचे टेंडर, तर कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातील ३०,६५,४५२ /- रुपयांचे टेंडर काढण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आले आहे.यासह अनेक ठिकाणी न झालेल्या कामाचे टेंडर,निकृष्ट दर्जाच्या कामांचे टेंडर काढण्यात आल्याने चौकशी झाली तर मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर येईल अशी शक्यता महाजन यांनी व्यक्त केली आहे.स्वछ सर्वेक्षणाच्या एका विभागात २० करोड रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा झाला असेल तर इतर विभागात किती असेल तोही १०० कोटींच्या घरात जाईल असे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image