अपोलो २३००० हून अधिक प्रत्‍यारोपण करण्‍यासह भारतातील प्रबळ मल्‍टी-ऑर्गन ट्रान्‍सप्‍लांटेशनमध्‍ये अग्रस्‍थानी; जागतिक नेतृत्‍व स्‍थापित

 


  1. अपोलो दरवर्षाला जगभरात सर्वाधिक अवयव प्रत्‍यारोपण करतात.
  2. २०२२ मध्‍ये १६४१ प्रत्‍यारोपण करण्‍यात आले.
  3. अपोलो ट्रान्‍सप्‍लांट प्रोग्राम १८५०० मूत्रपिंड प्रत्‍यारोपण४३०० यकृत प्रत्‍यारोपण आणि ५०० लहान मुलांचे यकृत प्रत्‍यारोपण करण्‍याचा टप्‍पा गाठणारा भारतातील पहिला प्रोग्राम आहे.    

राष्‍ट्रीय :- अपोलो या जगातील सर्वात मोठ्या व्‍हर्टिकली एकीकृत आरोग्‍यसेवा प्रदाता कंपनीने अपोलो ट्रान्‍सप्‍लांट प्रोग्रामची स्‍थापना केल्‍यापासून २३,००० प्रत्‍यारोपण पूर्ण केल्‍याची घोषणा केली.अपोलो ट्रान्‍सप्‍लांट प्रोग्राम जगातील सर्वात प्रगत व सर्वसमावेशक प्रत्‍यारोपण प्रोग्राम आहेजो अत्‍याधुनिक सेवांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ पासून हा प्रोग्राम दरवर्षाला १२०० हून अधिक प्रत्‍यारोपण करत आहे. २०२० मध्‍ये कोविड महामारीच्‍या प्रादुर्भावामुळे आव्‍हानात्‍मक स्थिती निर्माण झाली असताना देखील ८१४ प्रत्‍यारोपण करण्‍यात आले. पण २०२२ मध्‍ये १६४१ प्रत्‍यारोपणाच्‍या अपवादात्‍मक टप्प्यासह प्रोग्राम नव्‍या उंचीवर पोहोचलाज्‍यामधून उल्‍लेखनीय निष्‍पत्ती दिसून येते आणि दर्जात्‍मक केअर सेवा देण्‍याप्रती विश्‍वास व अविरत कटिबद्धतेवर निर्माण झालेली प्रतिष्‍ठा अधिक दृढ होते. विशेष म्‍हणजे १८५०० मूत्रपिंड प्रत्‍यारोपण४३०० यकृत प्रत्‍यारोपण आणि ५०० लहान मुलांचे यकृत प्रत्‍यारोपण करण्‍याचा मोठा टप्‍पा गाठणारा हा भारतातील पहिला प्रोग्राम आहे. अपोलो हॉस्पिटल्‍सने १९९८ मध्‍ये प्रौढ व्‍यक्‍ती व मुलावर भारतातील पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले आणि १९९९ मध्ये पहिले एकत्रित यकृत मूत्रपिंड प्रत्यारोपण केले.

       अपोलो हॉस्पिटल्‍स ग्रुपचे संस्‍थापकीय अध्‍यक्ष डॉ. प्रताप रेड्डी म्‍हणाले, ''आमच्‍या प्रयत्‍नांमधून व्‍यक्‍तींना सर्वोत्तम आरोग्‍यसेवा मिळत असल्‍याचे पाहून आम्‍हाला आनंद होत आहे. तसेच जगभरातील रूग्‍णांनी आमच्‍यावर मोठा विश्‍वास दाखवला आहे. या टप्‍प्‍यामधून आम्‍ही केअर व तंत्रज्ञाान या दोन अत्‍यंत महत्त्वपूर्ण पैलूंसह भारतात निर्माण केलेल्‍या सर्वोत्तम वैद्यकीय पद्धतींमधील सुधारणा दिसून येतात. आम्‍ही देशवासीयांना आरोग्‍यदायी ठेवण्‍याचा प्रयत्‍न करत असताना आपणा सर्वांसाठी जागतिक दर्जाच्‍या केअर सेवा देत राहू.''भारत वैद्यकीय उपचाराचा शोध घेणाऱ्या जगभरातील रूग्‍णांसाठी लोकप्रिय हब म्‍हणून उदयास आले आहे. अपोलोने प्रबळ अवयव प्रत्‍यारोपणअत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्‍ट्रीय दर्जानुसार उच्‍चस्‍तरीय आरोग्‍यसेवा देण्‍याच्‍या क्षेत्रात अग्रणी म्‍हणून स्‍वत:चे नाव स्‍थापित केले आहे. २३,००० प्रत्‍यारोपण करण्‍याच्‍या प्रभावी ट्रॅक रेकॉर्डमध्‍ये ३० टक्‍के आंतरराष्‍ट्रीय रूग्‍ण होते. यासह अपोलो क्षेत्रातील अग्रणी योगदानकर्ता ठरली आहे. विशेष म्‍हणजे अपोलो भारतातील सर्व प्रत्‍यारोपणांपैकी जवळपास १२ टक्‍के प्रत्‍यारोपण करतात आणि जगभरातील १ टक्‍के प्रत्‍यारोपण प्रक्रियांसाठी त्‍यांच्‍या कौशल्‍यांचा वापर केला जातो.अपोलोने अमेरिकाकॅनडाफिलीपाइन्‍सइंडोनेशियासंयुक्त अरब अमिरातीकतारबहारीनजॉर्डनपाकिस्तानकेनियाइथिओपियानायजेरियासुदानटांझानियाबांग्लादेशनेपाळश्रीलंकासीआयएसम्यानमार यांसह ५० हून अधिक देशांतील रुग्णांमध्ये प्रत्यारोपण केले आहे. अपोलो हॉस्पिटल्‍स एंटरप्राइजच्‍या कार्यकारी उपाध्‍यक्ष डॉ. प्रीथा रेड्डी म्‍हणाल्‍या, ''वैद्यकीय केअरचा शोध घेणाऱ्या अनेक आंतरराष्‍ट्रीय रूग्‍णांनी आरोग्‍यसेवा क्षेत्रातील अग्रणी म्‍हणून प्रतिष्‍ठेमुळे भारताला प्राधान्‍य दिले आहे. आम्‍ही व्‍यावसायिक सर्वोत्तमता व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रबळ फ्रेमवर्क स्‍थापित केले आहे आणि रूग्‍णांच्‍या गुंतागूंतीच्‍या मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासह निष्‍पत्ती व केअरवर अधिक भर दिला आहे. अपोलोमध्‍ये आम्‍ही इकोसिस्‍टमचा सर्वोत्तमरित्‍या फायदा घेतला आहे. आमचा प्रत्‍येक व्‍यक्‍तीला आंतरराष्‍ट्रीय दर्जाची आरोग्‍यसेवा देण्‍याचा दृष्टिकोन आहे आणि आम्‍ही आमच्‍या हॉस्पिटल्‍समध्‍ये दर्जात्‍मक केअर सेवा देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.''अपोलो ट्रान्सप्लांट प्रोग्राम हा सर्वोत्तम पायाभूत सुविधांसह सुस्थापित आहे, जो जागतिक स्तरावर प्रख्यात ट्रान्सप्लांट सर्जननेफ्रोलॉजिस्टगॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टबालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टबालरोग शल्यचिकित्सकऍनेस्थेटिस्टअतिदक्षता चिकित्सक आणि प्रयोगशाळा तज्ञांच्या प्रख्यात समूहाद्वारे प्रदान केला जातोप्रोग्रामने गेल्या दशकात विश्वासार्हता आणि विश्वासासाठी प्रतिष्ठा प्राप्‍त केली आहेउच्च दर्जाची केअर सेवा प्रदान  केली आहे आणि जागतिक स्तरावर अतुलनीय परिणाम निर्माण केले आहेत.इंद्रप्रस्‍थ अपोलो हॉस्पिटल्‍स येथील ग्रुप मेडिकल डायरेक्‍टर व सीनियर पेडिएट्रिक गॅस्‍ट्रोएन्‍टरोलॉजिस्‍ट डॉ. अनुपम सिबल म्‍हणाले, ''आम्‍हाला हा टप्‍पा गाठण्‍याचा आनंद होत आहे आणि जगभरातील अवयव निकामी होण्‍याच्‍या अंतिम टप्‍प्‍यावर असलेल्‍या रूग्‍णांना आशेचा किरण देण्‍यास सन्‍माननीय वाटते. आम्‍ही आता मुले व प्रौढ व्‍यक्‍तींवर नियमितपणे गुंतागूंतीचे मूत्रपिंड प्रत्‍यारोपण, एकत्रित यकृत-मूत्रपिंड प्रत्‍यारोपणएकत्रित मूत्रपिंड-स्‍वादुपिंड प्रत्‍यारोपण, मल्‍टी-ऑर्गन ट्रान्‍सप्‍लांट्सहृदय प्रत्‍यारोपणफुफ्फुस प्रत्‍यारोपण, हृदय-फुफ्फुस प्रत्‍यारोपण व यकृत प्रत्‍यारोपण करतो. एबीओ विसंगत यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण४ किलोपेक्षा अधिक वजन असलेल्‍या तान्‍ह्या बाळांमध्ये यकृत प्रत्यारोपणाचा आमचा प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड आहे१९९८ मध्ये अपोलो हॉस्पिटल्स दिल्ली येथे भारतातील पहिले यशस्वी बाल यकृत प्रत्यारोपण करण्‍यात आलेला संजय आता डॉक्‍टर म्‍हणून शिक्षण घेत आहे.''अपोलो ट्रान्‍सप्‍लांट इन्स्टिट्यूट्स २४ हून अधिक ठिकाणी कार्यरत आहेतज्‍यापैकी ८ इन्स्टिट्यूट्स यकृत प्रत्‍यारोपण करतात६ इन्स्टिट्यूट्स मल्‍टी-ऑर्गन ट्रान्‍सप्‍लांट्स करतात. यामधून यकृतमूत्रपिंडफुफ्फुस व हार्ट फेलरबाबत काळजी घेण्‍यासाठी सुसज्‍ज असलेल्‍या विविध सेवांची खात्री मिळते. २५० हून अधिक डॉक्‍टर्स संस्‍थेच्‍या प्रबळ अवयव प्रत्‍यारोपण प्रोग्रामसाठी सल्‍लागार म्‍हणून सेवा देतात. भारतात अवयव प्रत्‍यारोपणांचे प्रमाण वाढत असताना अपोलो ट्रान्‍सप्‍लांट प्रोग्राम महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे, जो नाविन्‍यतेला चालना देत आहे आणि जगभरातील रूग्‍णांना प्रगत व दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा देण्‍यासाठी प्रेरणास्रोत म्‍हणून सेवा देत आहे. वैद्यकीय क्षमतांना अधिक दृढ करण्‍याप्रती अविरत कटिबद्धतेसह अपोलोचा प्रत्‍यारोपण उपक्रम सर्वोत्तमतेसाठी उल्‍लेखनीय मानक स्‍थापित करतोसतत वैद्यकीय सुधारणांना चालना देतो आणि अवयव प्रत्‍यारोपण क्षेत्राला पुनर्परिभाषित करतो. नवीन तंत्रांमध्‍ये अग्रणी राहतउल्‍लेखनीय संशोधनाला चालना देत आणि अपवादात्‍मक रूग्‍ण केअर सेवा प्रदान करत अपोलोचा प्रोग्राम अग्रस्‍थानी आहेपरिवर्तनात्‍मक वैद्यकीय सोल्‍यशन्‍सच्‍या शोधात असलेल्‍या जगभरातील रूग्‍णांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image