तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?

नवी मुंबई :- सानपाडा गावात अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास येताच सिडकोने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.त्यावेळी सानपाडा गावातील हेमंत विष्णू मढवी यांचे सर्व्हे क्रमांक १ व ५४ या जागेवर इमारतीचे काम सुरु होते.त्यावर ३० /०४ /२०२४ रोजी सिडकोकडून करण्यात आलेल्या स्थळ पाहणी दरम्यान निदर्शनास आले कि अंदाजे ६०.०० चौ.मी (अंदाजे) मापाचे R.C.C (G + २) चे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे ०८ / ०५ / २०२४ रोजी हेमंत विष्णू मढवी यांना नोटीस बजावण्यात आली.सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मढवी यांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.त्यांनी वेळेत कागदपत्रे सादर न केल्याने अखेर त्या इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच जागेवर पुन्हा बांधकाम सुरु करण्यात आले आहे.सदरील बांधकाम धारकाने सिडको बरोबर सेटलमेंट केली असल्याची चर्चा गावात सुरु असल्याने या चर्चेचे सिडको समोर आव्हान आहे.चर्चा जरी सिडकोच्या विरोधात असली तरी यावर सिडको काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे जाळे तयार होत असल्याने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने कारवाईचा धडाका लावला आहे.शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवत असतांना अनेकांना नोटीस बजावण्याचे कामही सिडको कडून करण्यात येत आहे.अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत इमारती अथवा पब किंवा बार यांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आजमितीस अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी शासन ,प्रशासन यंत्रणा खळबळून जागी होते आणि कारवाया सुरु होतात.जरी कारवाया सुरु असल्या तरी अधिकारी हातचा राखून कारवाया करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.नवी मुंबई शहरात बहुतांश अनधिकृत इमारती उभ्या राहत असून त्यावर विविध विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत.मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आर्थिक आशीर्वाद देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचे दिसून येते.





Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image