एपीएमसी’त भाजीची आवक निम्म्यावर, किरकोळ भाजीची मागणी कमी करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय


नवी मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या एपीएमसी बाजारपेठेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने भाजीची वाहतूक करणारी निम्मीच वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात दाखल झाली. गुरुवारी बाजारात भाजीची १६९ वाहने आली होती, तर शुक्रवारी ९५ वाहनेभाजी बाजारात आणली गेली. याच वेळी शनिवारपासून भाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी तुरळक भाजीची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात ‘बंद’चे स्वरूप असेल, असे चित्र आहे.
                   देशभरात जाहीर केलेल्या टाळेबंदीची मुदत सोमवार, ४ मे रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, करोनाबाधितांचा आकडा अधिक असल्याने मुंबई महानगर क्षेत्रात टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाजारात सध्या व्यापारी, काही माथाडी, मापाडी, वाहतूकदार आणि सर्वाधिक खरेदीदार अशी गर्दी होत आहे. गुरुवारी दिवसभरात पाच ते सहा हजार घटकांची रेलचेल होती. मात्र, व्यापाऱ्यांनी गुरुवारी शेतमालाची कमी मागणी नोंदविल्याने भाजीची १६९ वाहने एपीएमसी आली होती. शुक्रवारी ही संख्या निम्म्यावर आली होती. शनिवारी ही संख्या याहून कमी होणार आहे. त्यामुळे एपीएमसीत अघोषित बंद असेल.भाजी बाजारात खरेदीदारांची गर्दी होत आहे. ही खरेदी नागरिकांच्या सेवेसाठी नसून नफा कमावण्यासाठी आहे, असा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. एखाददुसरा खरेदीदार पोलिसांच्या भीतीने काही काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो. मात्र, पोलिसांची पाठ फिरताच टाळेबंदीचे सारे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतित आहे.घाऊक बाजारात करोना रुग्णांची संख्या २० च्या घरात गेली आहे. त्यांच्या संपर्कात किती जण आले होते, याची तपासणी सुरू आहे. बाजार बंद करण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यास समिती कारवाईची नोटीस बजावत आहे आणि बाजार सुरू ठेवल्यास करोनाचे भय आहे. अशा स्थितीत व्यापाऱ्यांनी शेतमालाची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू